Gulabrao Patil : 'दुष्काळ पडला तरी अन् नाही पडला तरी लोक...', शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Gulabrao Patil Controversial Statement : मागील काही दिवसांपासून महायुतीतील नेते शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 12 Oct : मागील काही दिवसांपासून महायुतीतील नेते शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत आल्याचं पाहायला मिळत आहे. माजी कृषीमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

सतत वादग्रस्त बोलण्याची त्यांना मोठी किंमत देखील मोजावी लागली आहे. त्यानंतर नुकतंच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी, 'लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचंय म्हणून आम्ही तुम्हाला निवडणुकीत काहीही आश्वासनं देतो. लोकांनी ठरवलं पाहिजे की आपल्याला काय मागायचंय.' असं वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्यावर त्यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं.

मात्र, या नेत्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं. अशातच आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील असंच एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Gulabrao Patil
BJP party entry : भाजपमध्ये होणार स्ट्रॉंग इनकमिंग : संकेत देत फडणवीसांनी घाबरलेल्या निष्ठावंतांनाही समजावलं

'लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि नाही पडला तरी शिव्याच देतात. शिव्या ऐकणे हा पुढाऱ्यांचा धंदाच आहे', असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता लोकांनी पुढाऱ्यांना जाब नाही विचारायचा तर कोणाला विचारायचा? लोकप्रतिनिधींचं नेमकं काम काय असतं? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Gulabrao Patil
Devendra Fadnavis: 'PMC'च्या निवडणुकीत भाजपसाठी अवघड असलेल्या प्रभागांबाबत CM फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये खान्देश शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, 'लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात आणि दुष्काळ नाही पडला तरीही पुढाऱ्यांना शिव्या देतात. शिव्या ऐकणं हाच आम्हा पुढाऱ्यांचा धंदा आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं.', असं वादग्रस्त वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com