Devendra Fadnavis: 'PMC'च्या निवडणुकीत भाजपसाठी अवघड असलेल्या प्रभागांबाबत CM फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन

PMC Election: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे जवळपास मानले जात आहे.
PMC  Election
PMC ElectionSarkarnama
Published on
Updated on

Pune News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक पातळीवर मित्रपक्षांसोबत युती करायची की नाही याचा निर्णय सोपवला आहे. तसेच त्यांनी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांच्या प्रवेशालाही परवानगी दिली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून माजी नगरसेवक, महत्त्वाचे पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात आहेत. या पक्षप्रवेशामागं भाजपचा मोठा प्लॅन असल्याचं समोर आलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता.11) भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये निवडणुकांना सामोरे जाताना कशा पद्धतीने रणनीती आखावी, तसंच स्वबळावरती का महायुतीमध्ये निवडणूक लढवावी आणि पक्षांमध्ये कोणत्या नेत्यांना प्रवेश द्यावा याबाबत चर्चा झाली. या बैठकीनंतर माध्यमांशी देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला.

पुणे शहरातील पक्षप्रवेशासाठी इच्छुक असलेले इतर नेतेमंडळी भाजपच्या (BJP) नेत्यांसह मुख्यमंत्र्यांना भेटून उमेदवारीचे आश्‍वासन मिळावे यासाठी प्रयत्नात आहेत. वडगाव शेरी, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर या विधानसभा मतदारसंघात भाजपसाठी अवघड असलेल्या प्रभागातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीनंतर स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे जवळपास मानले जात आहे. यावेळी आढावा बैठकीत मागच्या निवडणुकीत आणि आता काय परिस्थिती होती, युती संदर्भात आम्ही आढावा घेतला. अडचणी समजून घेतल्या. पक्षाची संघटना म्हणून बूथ रचना, निवडणुकीचे संघटनाबाबत चर्चा करून पुढील निर्देश देण्यात येणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.

PMC  Election
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना पश्चाताप; शिदेंच्या बंडावर पहिल्यांदाच सर्वात मोठं विधान; म्हणाले,'...तर शिवसेना फुटलीच नसती!'

फडणवीस म्हणाले,युतीच्या संदर्भात आम्ही आमचे अधिकार जिल्ह्यांना दिले आहेत. शक्य असेल तिथे युतीचाच प्रयत्न केला पाहिजे असे आदेश दिलेत. शक्य होणार नाही तिथे आम्ही स्वतंत्रपणे लढू पण, मित्रपक्षांवर टोकाची टीका करायची नाही. परिस्थितीप्रमाणे आमचे नेते चर्चा करत आहेत.

PMC  Election
Pune BJP Meeting: पुण्यात सर्वात मोठी घडामोड! भाजपच्या बैठकीनंतर भिडे गुरुजी अन् CM फडणवीसांची भेट, बंद दरवाजाआड नेमकं काय ठरलं?

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पक्षप्रवेशांबाबत फडणवीस म्हणाले, भाजपामध्ये कोणताही स्ट्राँग कार्यकर्ता आला, तर त्याला घेण्याची आमची भूमिका आहे. साधारणपणे भाजपमध्ये आमचे कार्यकर्ते लोकांना सामावून घेण्याच्या भूमिकेत असतात. त्यामुळेच भाजप मोठा झाला आहे. नाराजी देखील निर्माण होते, त्याठिकाणी आम्ही त्यांना समजावतो आणि ते समजून देखील घेतात,असंही फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com