Nitesh Rane : 'पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या?'; आदित्य ठाकरेंना क्लिनचीट, पण नितेश राणे मागे हटेनात!

Nitesh Rane On Aditya thackeray clean chit in disha salian suicide case : चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक तथा सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणात एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा मंत्री नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे.
Nitesh Rane - Disha Salian
Nitesh Rane - Disha Salian Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : चित्रपट अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक तथा सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणात मोठी ट्विस्ट आला आहे. भारतीय जनता पक्ष, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यासह विद्यमान मंत्री नितेश राणे यांनी ज्या ठाकरेंना घेरण्यासाठी दिशा सालियान प्रकरण लावून धरलं. त्याच प्रकरणात ते तोंडावर आपटले आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा खुलासा करताना आदित्य ठाकरेंना क्लिनचीट दिली आहे. ज्यानंतर आता पिता-पुत्र राणेंवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून निशान्यावर घेतलं जातयं. त्यांच्या टीका केली जातेय. आता या टीकेला मंत्री नितेश राणे यांनी पलटवार करताना, घाई-गडबड का करता? 'पिक्चर अभी बाकी है, आगे आगे देखो होता है क्या?' असे म्हणत आपण मागे हटणाऱ्यातले नसल्याचे संकेत दिले आहेत.

सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणात तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त्य केलेल्या एसआयटीनेच आदित्य ठाकरेंना क्लीन चीट दिली आहे. यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेले लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाले असून पुन्हा एकदा मंत्री नितेश राणे तोंडावर पडले आहेत. यावरून अधिवेशनात विधीमंडळाच्या आवारात प्रश्न केल्यावर त्यांनी, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून त्यावर जास्त न बोलले बरे. पण आता जे या प्रकरणावरून बोलत आहेत किंवा या आधी बोलले आहेत. ते जपून ठेवा ते तुम्हाला पुन्हा वाजवायला मिळेल असेही त्यांनी पत्रकांरांना म्हटलं आहे. यामुळे आता दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून राज्यात पुन्हा वाद पेटणार असल्याचे संकेत मिळत असून पुन्हा एकदा ठाकरे-राणे आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

एसआयटीने खुलासा केला असून त्या अहवालावर कोर्टाने आपले मत नोंदवत आदित्य ठाकरेंना क्लीन चीट दिली आहे. यावरून नितेश राणेंनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, एसआयटीने 17 जूनला यावर अहवाल कोर्टात सादर केला आहे. त्याबद्दल आपल्या कोर्टच्या पत्रकाराला विचारावे. नेमक कोणतं भाष्य कोर्टाने केलं आहे. ते आरोप फक्त नारायण राणे किंवा नितेश राणेंनी केलेत म्हणून रायकीय नाहीत. ते आरोप दिशाच्या वडिलांनी स्वतः केले आहेत. ते काय राजकीय होते का? ते मुद्दाम कोणाचं असंच नाव घेणार आहेत का? असाही सवाल उपस्थिती केला आहे.

Nitesh Rane - Disha Salian
Nitesh Rane : आधी बडगुजर, आता दिशा सालियान... ठाकरेंना नडणारे नितेश राणे पुन्हा तोंडावर आपटले!

दिशाच्या वडिलांनी जे कोर्टाला अफिडेव्हिड दिलं होतं. त्यात आदित्य ठाकरेंसह डिनो मोरिया याच्यासह इकरांची नावे अशीच घेतली नाहीत. त्यामुळे एक लक्षात, मी एवढंच सांगेन की, पिक्चर आम्ही बाकी आहे. अजून पूर्ण पिक्चर संपलेला नाही. पुढची तारीख सोळा दिलेली आहे. पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं. ते बघू. आत्ताच बोलण्यात काहीच अर्थ नाही.

पण दिशा केसमध्ये तापस करणारा एक अधिकारी यांच्याबरोबर असल्याचा दावा मी केला होता. त्याबद्दल एक पत्रही दिलं होतं. पण सरकारच्या नजरेत जे आलं त्या पद्धतीने त्यांनी अहवाल दिला आहे. पण त्या अहवाला विरोधात दिशाच्या वडिलांना कोर्टात एक अफिडेव्हिड दाखल केलं असून त्यात आदित्य ठाकरे यांच्याविरोधात नवा मुद्दा मांडला आहे.

ज्यात त्यांनी आपण आमदार असल्याचे लपवलं असून ते समाजसेवक आणि उद्योजक असल्याचे म्हटल्याचा उल्लेख केला आहे. जे कोर्टाला खोटी माहिती देतात. ते तुम्हाला काय खरं सांगणार? असा सवालही नितेश राणेंनी केला असून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नका अशी विनंती पत्रकारांना केली आहे.

Nitesh Rane - Disha Salian
Nitesh Rane : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मोर्चाला नितेश राणेंचा खोचक टोला; मार्गही सूचवला

दिशा सालियनचा मृत्यू

दिशा सालियन हिचा 9 जून 2020 रोजी मालाड येथील इमारतीच्या 12व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. ज्यानंतर पोलिस तपासात याला आत्महत्या असे सांगण्यात आले होते. पण ती आत्महत्या नव्हती, तिचा लैंगिक छळ करून हत्या करण्यात आली असा धक्कादायक दावा दिशाच्या वडिलांनी केला होता. तसेच या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत नव्या एसआयटी (विशेष तपास पथक) किंवा सीबीआयकडून करावी अशी मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com