
Mumbai News : दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात पहिल्या एसआयटीने चौकशी केली होती. त्या चौकशीतून आता अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. तर याआधीच मालवणी पोलिसांनी तयार केलेल्या क्लोजर रिपोर्टमधून दिशाचे वडील सतीश सालियान यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा धक्कादायक खुलासा करण्यात आला होता. तर याच महिलेला पैसे देण्यासाठी दिशावर दबाव होता. या कारणामुळे ती तणावात होती, असा खुलासा क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. यामुळे दिशा सालियान आत्महत्या प्रकरणास वेगळं वळण लागले होते. तर आता नव्याने एक माहिती समोर आली असून दिशाच्या लॅपटॉपमध्ये धक्कादायक माहिती मिळाल्याची अपडेट समोर आली आहे.
दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात आधीच्या एसआयटीने चौकशी केली होती. त्या चौकशीत दिशाच्या लॅपटॉप तपासण्यात आला होता. हा डेटा आता समोर आला असून या डेटात दिशाचे वडील सतीश सालियानं यांचा काही डेटा असल्याचे समोर आले आहे. तर हा डेटा व्हॉट्सअॅपचा असून यात महिलेशी संबंधीत माहिती आहे. तर ही माहिती दिशा पाहत होती याची माहिती वडील सतीश सालियानं यांना नव्हती. पण त्या महिलेला 3 हजार रुपये दिल्यावरून दिशानं वडिलांना जाब विचारला होता.
याप्रकरणी दिशाने 2 जून 2020 ला वडील सतीश सालियान यांना जाब विचारला होता. तर तीने 4 जूनला घर सोडले होते. ती मालाड मालवणीस गेल्याचे चौकशीत दिशानं मित्रांना सांगितलं होतं, असा दुजोरा दिशाच्या मित्रांनी पोलीस चौकशीत सांगितले होते.
दिशा सालियनने आत्महत्या केली की तिची हत्या झाली या वर्तुळात हे प्रकरण गेली पाच वर्ष फिरत आहेत. अशातच तिचे वडील सतीश सालियन यांनी याचिका दाखल करत नवा वाद निर्माण केला आहे. सतीश सालियन यांनी दिशा सालियनने आत्महत्या केली नाही. तर तिचा गँगरेप करून हत्या करण्यात आल्याचा दावा केला होता. पण क्लोजर रिपोर्टमधील पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार ती आत्महत्याच असल्याचेनंतर समोर आले होते.
पण आता दिशाच्या लॅपटॉपमधील तिच्या वडिलांच्या व्हॉट्सॲपच्या डेटावरून तिचे वडील एखाद्या महिलेच्या संपर्कात होते हे समोर आले आहे. ही माहिती तपासादरम्यान एसआयटी चौकशीत उघड झाली आहे. तसेच त्यांनी एका महिलेला 3000 रुपये पाठवले होते. यातूनच दिशा आणि तिच्या वडिलांमध्ये वाद झाला. त्या वादानंतरच तिने घर सोडून मालाड मालवणी गेली होती. तसेच तिने याबाबत तिच्या मैत्रिणींशी चर्चाही केली होती.
दिशाच्या प्रकरणात पहिल्या एसआयटी चौकशीत पोलिसांनी तिच्या मित्रांसह दिशाचे वडिल सतीश सालियन यांचाही जबाब नोंदवला होता. ज्यात त्यांनी, त्यांच्या एका मित्रासह लोणचे बनवण्याचा व्यवसायात सहभाग असल्याचे सांगितले होते. दरम्यान त्या मित्राचा मृत्यू झाला आणि मित्राच्या पत्नी आर्थिक अडचणीत सापडली होती. त्यांना काळजी वाटल्याने त्यांनी आर्थिक मदत करण्याचे ठरवले होते. त्यासाठी दिशालाही सांगितले होते. पण आधीच आर्थिकस्थिती चांगली नसल्याने दिशाने याला नकार दिला होता. तर सतीश सालियान यांनी त्या महिलेशी आणि आपल्यात काहीच नसल्याचे आधीच सांगितले होते.
दरम्यान दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात याचिका दाखल करत दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केलीय. या याचिकेतून ठाकरे गटाचे नेते आमदार आमदार आदित्य ठाकरे आणि दिनो मौर्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, दिशाभूल केल्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल करावा, दिशाचं शवविच्छेदनाचे चित्रीकरण आणि कागदपत्रांसह दिशाचा फोन आणि लॅपटॉप दिशाच्या कुटुंबाकडे देण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.