
Satish Salian Mumbai Police : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्याची माजी मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी, यासाठी तिच्या वडिलांनी चार दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल करत खळबळ उडवून दिली.
या याचिकेत दिशावर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या झाल्याचा आरोप करताना आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप तिच्या वडिलांनी केलेत. यानंतर आता सतीश सालियन यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यावेळी त्यांच्याबरोबर वकील होते. सतीश सालियन यांनी वकिलांसमवेत पोलिस आयुक्तांची घेतलेली भेट चर्चेत आली आहे.
सतीश सालियन हे त्यांची मुलगी दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशीसाठी लेखी तक्रार देणार आहे, अशी माहिती समोर येत आहे. या लेखी तक्रारीत आदित्य ठाकरेंना (Aaditya Thackeray) अटक करून चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले जात आहे. या तक्रारीवर पोलिस अॅक्शन घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सतीश सालियन यांचे वकिलांनी याप्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे आरोपी असल्याचे म्हटले आहे. तसेच याप्रकरणी परमवीर सिंह आणि सचिन वाझे यांची देखील चौकशी झाली पाहिजे. परमवीर सिंह आरोपींना त्यावेळी पाठीशी घालत होते. आदित्य ठाकरे ड्रग्ज रॅकेट चालवत होते, असा गंभीर आरोप देखील केला. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
दिशाच्या मृत्यूच्या 5 वर्षांनंतर तिच्या वडिलांनी याप्रकरणी पुन्हा कायद्याचे दरवाजे ठोठावले आहेत. दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल सांगायचं झालं तर, दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील एका इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. या घटनेच्या 6 दिवसांनंतर 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला.
सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूबद्दल 'सीबीआय'ने न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. सुशांत यांचा मृत्यूमागे हा कोणताही घातपात नाही. घातपात झाला असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही, असेही 'सीबीआय'ने क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.