Disha Salian Death Case: कोण होती दिशा सालियन? आदित्य ठाकरेंचा संबंध काय...

Sushant Singh Rajpur Death Case : मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Disha Salayani
Disha Salayanisakarnama
Published on
Updated on

Mumbai Latest News : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे (Aditya thackeray) यांनी दिशा सालियन यांची हत्या केल्याचा गंभीर आरोप आमदार निलेश राणे यांनी केला होता. या प्रकरणाची एसआयटी चौकशी देखील करण्याची मागणी त्यांनी केली होती. हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा यांच्या मृत्यूची चौकशी एसआयटीच्या माध्यमातून करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे दिशा सालियान कोणी होती? त्यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला राजकीय वळण कसे लागले हे समजून घेऊया.

कर्नाटकातील जन्म

दिशा सालियन यांचा जन्म २६ मे १९९२ रोजी कर्नाटाकातील उड्डपी येथे झाला. सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील दादर पारसी असेंब्ली हायस्कूल येथे झाले. तर आर डी नॅशनल काॅलेज ॲंण्ड डब्लू ए सायन्स येथून त्यांनी मास मीडिया विषयात पदवी घेतली.

Disha Salayani
Bhupendra Bhayani: केजरीवालांना धक्का; आमदार भूपेंद्र भायाणींचा राजीनामा, भाजपात प्रवेश करणार

दिशा यांनी अशी केली कामाची सुरूवात

दिशा यांनी सुरुवातीच्या कालावधीमध्ये एका मोठ्या माध्यमसंस्थेत काम केले. तीन वर्षे त्या माध्यमसंस्थेत होत्या. मात्र, पुढे हे काम सोडून त्यांनी बाॅलिवूडमधील कलाकारांसाठी मॅनेजमेंट आणि पीआर कंपनीच्या माध्यमातून काम करण्यास सुरुवात केली. सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून त्या काम करत होत्या. वरूण शर्मा, सुशांत सिंग राजपूत यांच्या मॅनेजर म्हणून देखील त्यांनी काम केले होते.

कसा झाला मृत्यू

आठ जून २०२० मध्ये मुंबईत दिशा यांचा इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची नोंद आत्महत्या म्हणून केली होती. ही घटना घडली तेव्हा दिशा या आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या प्लॅटमध्ये होत्या. त्या राहत असलेल्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न रोहन यांनी केला. त्यांना खोलीत दिशा दिसली नाही. म्हणून त्यांनी खिडकीतून खाली पाहिले असता दिशा खाली पडलेल्या दिसून आल्या.

Disha Salayani
Parliament Winter Session 2023 : केंद्र सरकार विरोधकांचं ऐकेनासं झालंय

राणे परिवाराकडून आदित्य ठाकरेंवर आरोप

दिशा यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्या प्लॅटमध्ये पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये दिशा यांच्यावर बलात्कार झाला. त्यांनी आत्महत्या केली नसून, त्यांची हत्या झाली आहे. यामध्ये त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पूत्र आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप केंद्रीय लघू आणि सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलिसांकडून क्लीन चीट

मुंबई पोलिसांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आत्महत्येची नोंद केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, दिशा सालियान प्रकरणातील तपास अधिकाऱ्याने सखोल तपास केला. दिशा यांनी आत्महत्या केली त्या रात्री कोणीतीही पार्टी सुरू नव्हती. ना त्यांच्यावर बलात्कार झाल्याचा पुरावा आहे. दिशा यांची हत्या झाली नसल्याच्या निष्कर्षापर्यंत तपास अधिकारी पोहोचले आहे. तसेच यात राजकीय संबंध नसल्याचे ही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते.

Disha Salayani
Nagpur Winter Session : 'सुशांत राजपूत, दिशा सालियन यांची हत्याच!'

आई-वडिलांची महिला आयोगात धाव

दिशा यांच्या विषयी करण्यात येणाऱ्या आरोपांमुळे त्यांचे आई-वडिल व्यथित झाले होते. या प्रकरणी त्यांनी महिला आयोगाला पत्र लिहून आपल्या मुलीच्या बाबातीत चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. तिच्या आत्महत्या प्रकरणी होणाऱ्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झालो आहोत, असे या पत्रात म्हटले होते. तसेच मुंबई पोलिसांना देखील पत्र लिहून आपल्या मुलीबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. आपल्या कुटुंबाची यामुळे बदनामी होत असल्याचे सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com