Bhupendra Bhayani: केजरीवालांना धक्का; आमदार भूपेंद्र भायाणींचा राजीनामा, भाजपात प्रवेश करणार

AAP MLA Bhupendrabhai Bhayani : आमदार भूपेंद्र भायाणी यांच्यानंतर अजून दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत
Arvind Kejriwal and Bhupendra Bhayani
Arvind Kejriwal and Bhupendra BhayaniSarkarnama
Published on
Updated on

Gujarat News: गुजरातमध्ये आम आदमी पार्टीला एक झटका बसला आहे. विसावदर विधानसभा मतदारसंघाचे आपचे आमदार भूपेंद्र भायाणी यांनी राजीनामा दिला आहे. तसेच ते आता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. विधानसभा अध्यक्ष शंकर चौधरी यांनी भायाणी यांचा राजीनामा स्वीकार केला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हर्षद रिबडिया यांचा पराभव केला होता.

गेल्यावर्षी गुजरात निवडणुकामध्ये आपने पाच जागांवर विजय मिळवला होता. मात्र, आता आम आदमी पार्टीचे विसावदर मतदारसंघाचे आमदार भूपेंद्र भायाणी यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पार्टीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. भायाणी यांच्या राजीनाम्यामुळे आपच्या गुजरातमधील आमदारांचे संख्याबळ घटले आहे.दरम्यान, आमदार भूपेंद्र भायाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या ठिकाणी पोटनिवडणूक लागणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Arvind Kejriwal and Bhupendra Bhayani
Manipur : नवीन सरकार बनताच मिझोराम अन् मणिपूरचे मुख्यमंत्री भिडले...

भूपेंद्र भायाणी हे पाटीदार समुदायातील नेते आहे. निवडणुकीवेळी त्यांना भाजपने तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी आपच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. दरम्यान, निवडणुकीच्या निकालानंतरच त्यांनी भाजपात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, अशी चर्चा आहे. अखेर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान, राजीनाम्यानंतर मी पहिल्यापासूनच भाजपमध्ये असल्याची प्रतिक्रिया भायाणी यांनी दिली आहे.

आणखी दोन आमदार देणार राजीनामा ?

भायाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर आपचे आणखी दोन आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. बोटाद विधानसभेचे आमदार उमेद मकवाणा आणि गिरियाधर या मतदारसंघाचे सुधीर वाघानी हे दोन आमदार आम आदमी पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची बोलले जात आहे. या दोघांनीही राजीनामा दिल्यास आम आदमी पक्षाकडे गुजरात विधानसभेमध्ये केवळ दोनच उमेदवार शिल्लक असतील.

(Edited by- Ganesh Thombare)

Arvind Kejriwal and Bhupendra Bhayani
BJP Caste Politics : तीन राज्यांमध्ये भाजपने असा साधला जातीय समतोल; कोण ठरले ‘फेव्हरेट’?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com