Loksabha Election Results 2024 : लोकसभेच्या परीक्षेत 6 डॉक्टर पास तर 6 डॉक्टर नापास

Loksabha Election Doctor candidates win: लोकसभेच्या निवडणुकीत व्यवसायाने डॉक्टर असलेले ६ उमेदवार विजयी झाले असून ६ उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.
Loksabha Election 2024 Survey
Loksabha Election 2024 SurveySarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभेच्या निवडणुकीत विविध पक्षांकडून तब्बल 12 डॉक्टर पदवी असलेले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यातील व्यवसायाने डॉक्टर असलेले 6 उमेदवार विजयी झाले असून 6 उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.

राज्यातील नवनिर्वाचित ४८ खासदारांमध्ये डॉक्टर खासदारांचा बोलबाला राहिला आहे. विजयी झालेल्या सहा खासदारांमध्ये डॉ. शोभा बच्छाव (धुळे), डॉ. प्रशांत पडोळे (भंडारा- गोंदिया), डॉ. कल्याण काळे (जालना) व शिवाजी काळगे (लातूर) हे चार खासदार काँग्रेसचे आहेत. डॉ. श्रीकांत शिंदे (कल्याण) हे शिवसेनेचे तर डॉ. हेमंत सावरा (पालघर) हे भाजपचे आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्या डॉक्टर उमेदवार पैकी डॉ. हीना गावित, डॉ. सुभाष भामरे, डॉ. अभय पाटील, डॉ. मोहन राईकवार, डॉ. भारती पवार, डॉ. सुजय विखे-पाटील या सहा डॉक्टरांनच्या पदरात पराभव पडला आहे. 

तसेच आडनाव साधर्म्य असलेले खासदार मात्र वेगवेगळ्या विरोधी पक्षातील आहेत. यात प्रतापराव जाधव (बुलडाणा - शिवसेना, शिंदे), संजय जाधव (परभणी- शिवसेना, उबाठा), अमर काळे (वर्धा - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), कल्याण काळे (जालना - कॉंग्रेस), श्रीकांत शिंदे ( कल्याण - शिवसेना, शिंदे), प्रणिती शिंदे (सोलापूर - कॉंग्रेस), संजय दिना पाटील (ईशान्य मुंबई - शिवसेना, उबाठा), विशाल पाटील (सांगली -अपक्ष), उदयनराजे भोसले (सातारा - भाजप) व श्रीमंत शाहू महाराज भोसले (कोल्हापूर - कॉंग्रेस) हे दोन राजघराण्यातील उमेदवार विजयी झाले आहेत.

यापूर्वी लोकसभा निवडणुकीत वकील उमेदवार विजयी होण्याचे प्रमाण जास्त होते. यंदा मात्र फक्त एकच वकील उमेदवार महाराष्ट्रातून केंदात गेला आहे. राज्यात ॲड. गोवाल पाडवी (नंदुरबार - कॉंग्रेस) हे एकमेव वकील विजयी झाले आहेत.  तर सुप्रसिद्ध वकील ॲड. उज्वल निकम (उत्तर मध्य मुंबई) , वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (अकोला) व ॲड. सुनील गोंदण (उत्तर मुंबई) या  तीन प्रमुख वकील उमेदवारांचा पराभव झाला आहे.

महाराष्ट्रातून ७ महिला खासदार दिल्लीत गेल्या आहेत. यामध्ये सुप्रिया सुळे (बारामती - राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार), डॉ. शोभा बच्छाव (धुळे - कॉंग्रेस), स्मिता वाघ ( जळगाव - भाजप), रक्षा खडसे ( रावेर - भाजप), प्रणिती शिंदे ( सोलापूर - कॉंग्रेस), वर्षा गायकवाड ( उत्तर मध्य मुंबई - कॉंग्रेस), प्रतिभा धानोरकर ( चंद्रपूर - कॉंग्रेस) या सात रणरागिणी विजयी झाल्या. पंकजा मुंडे (बीड), सुनेत्रा पवार (बारामती), यामिनी जाधव (दक्षिण मुंबई), वैशाली राणे - दरेकर (कल्याण), राजश्री पाटील (यवतमाळ - वाशिम), डॉ. भारती पवार (दिंडोरी), डॉ. हीना गावित (नंदुरबार), अर्चना पाटील (धाराशिव) व नवनीत राणा (अमरावती) या नऊ रणरागिणींना पराभवाचे धनी व्हावे लागले.

Loksabha Election 2024 Survey
Nana Patole : नाना, सबुरीनं घ्या; काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पटोलेंचे धरले कान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com