Dombivli Rain : डोंबिवलीत पावसाचे तांडव ; खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यातही पाणी शिरले

Shrikant Shinde bungalow : डोंबिवलीसह परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. खासदाराचं घरं सुरक्षित नसेल तर आम्ही कुठे जाणार असा सवाल आजूबाजुच्या सर्वसामन्य नागरिकांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.
Dombivli Rain,Shrikant Shinde bungalow
Dombivli Rain,Shrikant Shinde bungalowSarkarnama
Published on
Updated on

Shrikant Shinde : हवामान खात्याने आज, मंगळवार 19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार रात्रीपासून मुंबई व उपनगरांत जोरदार पाऊस कोसळत आहे. कल्याण-डोंबिवली परिसरातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी परिसरात अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. विशेष म्हणजे याच भागात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा बंगला असून, त्या बंगल्यातही पावसाचे पाणी शिरले आहे. बंगल्याच्या आवारात जवळपास कंबरेपर्यंत पाणी साचलेले दिसून येत आहे.

डोंबिवलीच्या एमआयडीसी परिसरातील सुयोग हॉटेलजवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांचा बंगला आहे. या बंगल्याला ‘श्री सदगुरु बंगला’ असे नाव देण्यात आले आहे. हा बंगला कल्याण-शीळ मार्गालगतच्या एमआयडीसी भागात स्थित आहे. बंगल्याच्या शेजारीच एक मोठा नाला असून, त्यामध्ये एमआयडीसीकडून प्रदूषित रसायनांचा विसर्ग केला जातो. या नाल्याची स्वच्छता न केल्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतोच याशिवाय आता खासदारांनाही त्याचा फटका बसला आहे.

सकाळपासून डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे परिसरातील नाला भरून वाहू लागला. त्याचे पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरले असून अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. या पाण्याचा फटका कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बंगल्यालाही बसला आहे. श्रीकांत शिंदे येथे कधीकधी वास्तव्य करतात, मात्र पावसाच्या वेळी ते घरी नव्हते. याच बंगल्यात पक्षाचे कार्यालय असून कार्यकर्त्यांच्या बैठका देखील याच ठिकाणी घेतल्या जातात. सध्या बंगल्यात पाणी काढण्याचे काम सुरू असून पावसामुळे परिसरात मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.

Dombivli Rain,Shrikant Shinde bungalow
Lendi River Flood News: तीस वर्षांपासून निकष डावलून काम! लेंडी नदीला महापूर कशामुळे? 6 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

सन 2018 मध्ये या भागात पाणी शिरले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी घुसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नाल्यांची सफाई हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. “खासदारांच्या बंगल्यातच पाणी शिरत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील?” असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.

सन 2018 मध्ये देखील या भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते, त्यानंतर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी घुसल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नाल्यांची सफाई हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. “खासदारांच्या बंगल्यातच पाणी शिरत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल होत असतील?” असा प्रश्न स्थानिकांनी विचारला आहे.

Dombivli Rain,Shrikant Shinde bungalow
Nashik ZP CEO Omkar Pawar : 11 किलो वजन, 93 सेमी उंची.. कुपोषित दीपकसाठी जिल्हा परिषद सीईओ बनले 'पोषण दूत'

सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे डोंबिवलीतील अनेक रस्ते व घरे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, त्रस्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com