ACB Action : तानाजी सावंतांना नडलेला अधिकारी पुन्हा चर्चेत : लाचेसाठी मध्यस्थामार्फत लावलेली सेटिंग ACB ने उधळली

Dr Bhagwan Pawar Bribery Case : आरोग्य उपसंचालक विभागातील आरोग्य सेवकाने बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने कारवाई केली आहे.
Bribery Case Maharashtra
Bribery Case MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Bribery Case : डाॅ.भगवान पवार हे पुणे महापालिकेत आरोग्य अधिकारी असताना त्यांनी तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी पंगा घेतला होता. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सावंत यांच्याकडून बेकायदेशीर टेंडरसाठी दबाव येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. सावंत यांना नडणाऱ्या पवार पुन्हा चर्चेत आले आहेत. आरोग्य सेवकामार्फत लाच स्वीकारण्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. सध्या त्यांच्याकडे आरोग्य उपसंचालक पदाचा कार्यभार आहे.

आरोग्य उपसंचालक विभागातील आरोग्य सेवकाने बदलीसाठी तीन लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एका आरोग्य सेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा परिषद कार्यालयासमोर सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदार (वय ४१) हा आरोग्य सेवक असून, जून २०२५ मध्ये त्यांची उपसंचालक कार्यालय कोल्हापूर मंडळ येथून उपसंचालक कार्यालय पुणे मंडळ येथे अंतरमंडळ बदली झाली होती. मात्र, पुणे मंडळात त्यांना अद्याप पदस्थापना देण्यात आलेली नव्हती. प्राथमिक आरोग्य केंद्र, बावडा (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे रिक्त असलेल्या आरोग्य सेवक पदावर नेमणूक मिळावी, यासाठी त्यांनी विनंती अर्ज केला होता.

Bribery Case Maharashtra
Maharashtra Government Decision : पीक कर्ज घेणं आणखी स्वस्त अन् सोपे; महाराष्ट्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

या अनुषंगाने आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची भेट घेतली असता, त्यांनी आरोपी रामकिसन घ्यार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. त्यानंतर आरोपीने तक्रारदारास मागितलेल्या ठिकाणी बदली करून देण्यासाठी डॉ. पवार यांच्यासाठी तीन लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याबाबत तक्रारदाराने २ डिसेंबर रोजी पुणे एसीबीकडे तक्रार दाखल केली.

एसीबीने सापळा रचून रामकिसन गंगाधर घ्यार याला अटक केली. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या सूचनेनुसार निरीक्षक प्रसाद लोणारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे करीत आहेत.

Bribery Case Maharashtra
MLA Suresh Bhole : जळगावात भाजपचा विसरभोळा आमदार, घराणेशाहीचा नियम विसरुन मुलाला केलं बिनविरोध नगरसेवक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com