

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. 2016 मधील ग्राम पंचायत विकास अधिकारी (VPDO) भरती परीक्षा घोटाळ्याच्या तपासात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. रावत यांचे माजी विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) चंदन सिंग जीना यांच्या घरावर ED ने छापा टाकला. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड, सोने आणि महागडी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत.
ED च्या कारवाईत चंदन सिंग जीना यांच्या घरातून तब्बल 32 लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम मिळाली. याशिवाय 200.5 ग्रॅम सोने आणि महागड्या ब्रँडची 12 घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेल्या वस्तूंची सुरुवातीची किंमत सुमारे 1.28 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. काही घड्याळांची किंमत अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही.
चंदन सिंग जीना हे 2009 ते 2017 या कालावधीत हरीश रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री असताना त्यांचे OSD म्हणून कार्यरत होते. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, 2016 च्या VPDO भरती परीक्षेतील OMR Sheets सुरक्षित ठिकाणाहून तत्कालीन सचिवांच्या घरी नेण्यात आल्या आणि त्यानंतर त्यामध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे.
ED च्या छाप्यात 32 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. याशिवाय 200.5 ग्रॅम सोने मिळाले असून त्यामध्ये 13 सोन्याची नाणी आणि 7 सोन्याच्या साखळ्यांचा समावेश आहे. तपास यंत्रणेच्या कारवाईत Rolex, Rado, Piaget, Movado, Tissot आणि Casio या नामांकित ब्रँडची 12 घड्याळेही सापडली. या जप्त केलेल्या वस्तूंची सुरुवातीची किंमत 1 कोटी 28 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. काही घड्याळांच्या किमतीचे मूल्यांकन अद्याप बाकी आहे.
ED ने PMLA अंतर्गत कारवाई करत चंदन सिंग जीना आणि त्यांच्या कुटुंबीयांची बँक खाती फ्रीज केली आहेत. या खात्यांमध्ये एकूण 52.16 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय जीना यांचा मोबाईल फोनही ED ने ताब्यात घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.