Girish Mahajan News: नाशिक महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 100 प्लस जागांचे टार्गेट निश्चित केले आहे. त्यासाठी महाविकास आघाडीच्या इच्छुक नगरसेवक आणि नेत्यांना भाजपने दरवाजे सताड उघडे केले आहेत. कोणीही या आणि प्रवेश घ्या, अशी स्थिती आहे. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडे येणारा ओळख घटण्याची शक्यता आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाशिक शहरात मर्यादित राहिला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे समर्थकांनी महापालिकेत ताकद अनुभवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना भाजपच्या तुलनेत दुबळे दिसत आहेत.
या परिस्थितीत महापालिकेच्या जागावाटपात भाजपचा वर्चस्व असेल. भाजपचे मावळत्या महापालिकेत 65 विद्यमान नगरसेवक होते. शहरातील तिन्ही आमदार भाजपचे आहेत. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजप पक्षात मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. जागा वाटपात भाजपचे वर्चस्व निर्माण होणार असल्याने नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा मुद्दा राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांनीही मागे टाकल्याचे दिसते आहे.
भाजपने अनेक इच्छुकांना आणि विरोधकांच्या प्रबळ नेत्यांना प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपकडे सर्व जागांवर दोन ते तीन इच्छुक उमेदवारीसाठी रांगेत आहेत. त्यामुळे मला वाटपाचा गंभीर पेच भाजपमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीत महायुती निवडणुकीला एकत्र सामोरे जाणार की महायुतीच्या सहकारी पक्षांना गाफील ठेवून ऐनवेळी स्वबळावर निवडणूक लढविणार याची जोरदार चर्चा आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीच्या सहकारी पक्षांवर राजकीय दबाव निर्माण केला आहे. या दबावामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदे दोन्ही पक्ष पालकमंत्रिपदाचा अग्रह विसरले आहे. पालकमंत्री कोण याची आता हे नेते चर्चाही करत नाहीत. भाजपने खेळलेल्या डावपेचांमुळे सहकारी पक्ष चांगलेच खिंडीत सापडले आहेत.
रायगड जिल्ह्यात पालकमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे भरत गोगावले हे सातत्याने सहकारी पक्षाला दिवस असताना दिसतात. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या आदिती तटकरे आणि गोगावले यांच्यात शाब्दिक वाद रंगला आहे. त्या तुलनेत नाशिकमध्ये मात्र महायुतीचे घटक पक्ष भाजपच्या दबावाखाली आल्याने पालकमंत्रिपदाची चर्चाही विसरले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.