Pune News : महायुतीमधील दोन मित्र पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्व करत असलेल्या शिवसेनेमध्ये सारं काही अलबेल नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरुद्ध आक्रमकपणे टीका करताना पाहायला मिळत आहे. हेच चित्र पुण्यात देखील पाहायला मिळाले.
पुण्यातील धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आयोजित मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांच्यात जोरदार वादावादी झाली.
नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीमध्ये प्रश्नांची सोडवणूक न होता राजकीय कुरघोडी आणि दोन सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यात वाद झाल्याने हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
मोहल्ला कमिटीच्या बैठकीदरम्यान स्थानिक पायाभूत सुविधा, कचरा व्यवस्थापन आणि अनधिकृत बांधकामासंदर्भात चर्चा सुरू असताना पद्मावती भागातील एका सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याने प्रश्न उपस्थित करत म्हटले की, सोसायटीच्या बाजूला झोपडपट्टी असून अवैध धंदे चालतात तसेच ते बंद करण्याची मागणी देखील केली. यामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी उद्धव कांबळे यांनी हस्तक्षेप केला असता सुभाष जगताप यांनी बोलण्यास मज्जाव केला.
कांबळे यांना काही काळानंतर बोलण्याची संधी मिळाली तेंव्हा ती जागा सुभाष जगताप यांचीच होती, अशा प्रकारचा युक्तिवाद त्यांनी केल्यावर हा वाद उफाळला आणि दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं.
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर भाजपच्या नेत्यांवरत जोरदार टीका करत असताना दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील स्थानिक पदाधिकारी देखील अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकूणच चित्र पक्षांमध्ये समन्वय आहे का ? असा प्रश्न उपस्थित करत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.