Mumbai News : शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर अंतिम निकाल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आज दुपारी 4 वाजता देणार आहेत. त्यामुळे या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असल्याने शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट अशा दोन्ही बाजूंनी निकाल आमच्या बाजूनेच लागणार, असे दावे-प्रतिदावे करीत आहेत.
या निकालाबाबत ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनीही भाष्य करीत पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार आणि घटनेनुसार अध्यक्षांनी निर्णय दिला, तर शिंदे गटाचे आमदार 100 टक्के अपात्र होतील, असा दावा त्यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'आमदार अपात्रतेच्या प्रकरणाचा काही चुकीचा निर्णय झाला, तर देशाच्या लोकशाहीवर परिणाम करणारा निर्णय असू शकेल. भरत गोगावले हे नियमबाह्य आहेत. सर्वच घटनात्मक पद आता मोडीत निघालेली आहेत. नियम व कायदा पाळणारे हे लोक आहेत का? देशाची लोकशाही आणि संविधानाचा सन्मान राखायचा असेल, सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान राखायचा असेल तर शिंदे गटच अपात्र होईल, हेच नियमाला धरून असेल,' असं भास्कर जाधव म्हणाले.
'आमचे आमदार अपात्र ठरण्याचा काही संबंध नाही. पण तरीदेखील सर्व नियम धाब्यावर बसवायचे ठरवले असे दिसतेय. विद्यमान अध्यक्ष आजपर्यंत या पदावर असताना कोणीही कुठल्याही मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, असे ऐकिवात नाही. खरं तर मुख्यमंत्री अध्यक्षांना भेटायला येतात. पण अध्यक्ष स्वत: भेटायला जातात आणि का गेलो, याचं सरळ सरळ समर्थन करतात. याचाच अर्थ ही घटनात्मक पदांची गरिमा संपल्याचा संशय येतो,' असं जाधव म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.