NDA Meeting : एकनाथ शिंदेंच्या एका फोटोने महाराष्ट्र भाजपची धाकधूक वाढली! दिल्लीत अमित शाहांच्या शेजारी...

NDA meeting Delhi News : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथ मुक्कामी असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच दिल्लीत बुधवारी एनडीएची बैठक पार पडली.
NDA Delhi meeting
NDA Delhi meeting Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सहा जागा बिनविरोध झाल्या असल्यातरी 11जागेसाठी निवडणूक होत आहे. त्यामुळे एकीकडे राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यातील दरेगाव येथ मुक्कामी असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच दिल्लीत बुधवारी एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील एनडीएच्या घटकपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, याच बैठकीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो बाहेर आल्यानंतर राज्यातील महायुतीसह भाजपच्या नेतेमंडळीची धाकधूक वाढली आहे. दिल्लीतील बैठकीप्रसंगी एकनाथ शिंदेंचा वावर अमित शाहांच्या शेजारीच होता. त्यामुळे हा महाराष्ट्रासाठी मोठा सिग्नल मानला जात आहे.

दिल्लीत दोन दिवसापूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएची बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील भाजपचे (BJP) मित्रपक्षाचे नेते उपस्थित होते. या निमित्ताने भाजपने दिल्लीत मोठे शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, त्यामध्ये चर्चा रंगली आहे एकनाथ शिंदे यांच्या फोटोची. बैठकीच्या फोटोसेशनवेळी आणि प्रत्यक्ष बैठकीवेळी एकनाथ शिंदे हे अमित शाहांच्या बाजूला होते. त्यामुळे शिंदे यांचे दिल्ली दरबारी वजन वाढल्याची चर्चा रंगली आहे.

दिल्लीतील एनडीएच्या या बैठकीला देशभरातील घटकपक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. दिल्लीत नुकतीच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने 12 वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे एक बैठक पार पडली. यावेळी एनडीएमधील सर्व घटकपक्षांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीसाठी राज्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे तिघेही या बैठकीला उपस्थित होते. दिल्लीतील या एनडीएच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची चांगलीच चर्चा रंगली होती. बैठकीच्या फोटोसेशनवेळी आणि प्रत्यक्ष बैठकीवेळी एकनाथ शिंदे हे अमित शाहांच्या बाजूला होते. महाराष्ट्रातील अन्य दोन नेत्यांच्या तुलनेत एकनाथ शिंदे यांना मोदी-शाहांच्या जवळचे स्थान मिळाल्याने शिंदे यांचे राजकीय वजन आणखी वाढल्याची चर्चा रंगली आहे.

या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एनडीएच्या बैठकीत अमित शाहांच्या बाजूला बसले होते. दिल्लीत बैठक एनडीएची पण चर्चा एकनाथ शिंदे यांची होती. त्यांना या बैठकीवेळी अमित शाहांच्या बाजूचे स्थान देण्यात आले होते. या बैठकीवेळी शिंदे त्यांच्यासोबतच होते. राजधानीतील या बैठकीनंतर फोटोसेशनवेळी देखील ते शाहांच्या सोबत असल्याचा शिंदे यांचा फोटो आहे. त्यामुळे राज्यात मात्र या फोटोवरून वेगळीच चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com