Eknath Shinde News : ठरलं ! मुख्यमंत्री शिंदेंची 'धनुष्यबाण यात्रा' निघणार; 'या' शहरातून सुरूवात..

Dhanushyaban Yatra : जिथे जिथे ठाकरेंची सभा, तिथे तिथे शिंदेंची यात्रा?
CM Eknath Shinde News : Dhanushyaban Yatra
CM Eknath Shinde News : Dhanushyaban YatraSarkarnama

Shivsena News : महाविकास आघाडीने तिन्ही प्रमुख पक्षांनी राज्यभरात एकत्रित सभा घेण्याचा निर्णय घेऊन, शिंदे-फडणवीस सरकारपुढे आव्हान निर्माण केले आहे. दोन एप्रिल छत्रपती संभाजीनगर येथून या सभांना सुरूवात होणार आहे. मात्र महाविकास आघाडीला या सभांना उत्तर देण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यात्रा काढणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन एप्रिलला महाविकास आघाडीची सभा पार पडत आहे. याच सभेला प्रत्युत्तर म्हणून मुख्यमंत्री शिंदे धनुष्यबाण यात्रा काढणार आहेत. यात विशेष बाब म्हणजे, मुख्यमंत्र्यांची धनुष्यबाण यात्रेची सुरूवातसु्द्धा छत्रपता संभाजीनगर शहरातून होत आहे. आठ किंवा नऊ एप्रिलला शिंदेच्या धनुष्यबाण यात्रेला छत्रपती संभाजीनगरमधून सुरूवात होईल.

CM Eknath Shinde News : Dhanushyaban Yatra
Ajit Pawar News : आधी म्हणाले औरंगाबाद, मग छत्रपती संभाजीनगर..

जिथे जिथे उद्धव ठाकरे सभा घेत आहेत, त्याच्य ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांच्या सभा होत आहेत. असा उल्लेख मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या गुढी पाडवा मेळाव्यात केला. राज ठाकरे बोलल्याप्रमाणेच काहीसे चित्र आता दिसत आहे. कारण जिथे जिथे उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. त्याच ठिकाणी शिंदेंचेही यात्रा निघणार असल्याचे बोलले जाते.

CM Eknath Shinde News : Dhanushyaban Yatra
Ajit Pawar News : आधी म्हणाले औरंगाबाद, मग छत्रपती संभाजीनगर..

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी शिंदे-फडणवीस विरोधात आघाडी उघडणार आहे. त्याच ठिकाणाहून संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाण यात्रेला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरणधील ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे,यांच्या मोठ्या सभा पार पडल्या. त्याच मैदानावर शिंदेंची 'धनुष्यबाण यात्रे'च्या सुरूवातीची सभा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com