
Maharshtra Politics : राज्यात शिवसेनेचे संघटन वाढवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुसंडी मारण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंचवीस जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्री जाहीर केले. अकरा मंत्र्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली असून सर्वाधिक चार जिल्हे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे आहेत. तर भाजपचे प्राबल्य असलेल्या विदर्भातील तीन मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
तर मराठवाड्यात संभाजीनगर वगळता इतर जिल्ह्याची जबाबदारी भरत गोगावले, गुलाबराव पाटील, प्रकाश आबीटकर, संजय शिरसाट, (Sanjay Shirsat) योगेश कदम यांच्याकडे असणार आहे. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर भाजपने सदस्य नोंदणीवर भर देत संघटनात्मक बांधणीवर जोर दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही राज्यभरात पक्ष वाढीची मोहिम हाती घेतली आहे. त्यानंतर शिवसेनेनेही संपर्कमंत्री नेमत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे नव्या सरकारमध्ये नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. (Shivsena) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना त्यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन करा, असे आदेश दिल्याचा दावा केला. यावरून शिंदे आणि ठाकरेंच्या सेनेत जुंपली आहे.
मुंबईत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन, सत्ताधारी पक्षाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी यावरून वातावरण तापलेले आहे. या सगळ्या घडामोडी सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या संपर्क मंत्र्यांची यादी जाहीर केली. यापुढील काळात नियुक्त संपर्कमंत्री हे त्यांना दिलेल्या जिल्ह्यांमध्ये पक्ष वाढीसाठी काम करणार आहेत.
हे आहेत संपर्क मंत्री
- गुलाबराव पाटील- परभणी, बुलडाणा
- उदय सामंत- मुंबई उपनगर, पुणे, सिंधुदुर्ग
- शंभुराजे देसाई- सांगली, आहिल्यानगर
- संजय राठोड- नागपूर, चंद्रपूर, अमरावती
- दादाजी भुसे- धुळे, नंदूरबार
- प्रताप सरनाईक- पालघर, सोलापूर
- भरतशेठ गोगावले- हिंगोली, वाशिम
- संजय शिरसाट- नांदेड, बीड
- प्रकाश आबीटकर- अकोला, लातूर
- आशिष जैस्वाल- भंडारा, गोंदिया
- योगेश कदम- जालना
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.