Shivsena Identity Crisis : 'मुख्यमंत्री व्हायचे असेल तर भाजपात या, एकनाथ शिंदेंना अमित शहांची ऑफर!', भल्या पहाटे काय घडलं ते राऊतांनी सांगितलं

Sanjay Raut Claim Shivsena to Merge with BJP : संजय राऊत यांनी म्हटले आहे की, एकनाथ शिंदे हे शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 'वेस्टइन' हॉटेलात ही भेट झाली.
Amit Shah, Eknath Shinde
Amit Shah, Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : गृहमंत्री अमित शाह हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या पुण्यातील मुक्कामी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये अमित शाह यांनी मुख्यमंत्रिपद हवे असेल तर भाजपमध्ये विलीन होण्यास एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यात नेमका काय संवाद झाला हे देखील 'सामाना' वृत्तापत्रातील 'रोखठोक' या स्तंभामधून सांगितला आहे.

संजय राऊत यांनी लेखात म्हटले आहे की, एकनाथ शिंदे हे शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी पहाटे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 'वेस्टइन' हॉटेलात ही भेट झाली. या भेटीत शिंदेंनी शहाना सांगितले की, 'सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही, कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो. आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत.' हे सांगण्यासाठी शिंदे हे शाहांना पहाटे चार वाजता भेटले.

Amit Shah, Eknath Shinde
Neelam Gorhe : ठाकरे सेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हेंना भेटल्या? ‘ भेटले असते तर त्याबाबत जाब विचारला असता : गायकवाड

'शहा यांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता. गृहमंत्री अमित शहा व शिंदे यांच्यात चर्चा झाली व त्यात फडणवीस यांच्याविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता. त्या चर्चेचा तपशील बाहेर आला त्यामध्ये शिंदेंनी शहांना म्हटले की मला मुख्यमंत्री करण्याचे वचन दिले होते. त्यावर शहा म्हटले की आमचे 125 निवडून आले आहे मग तुम्ही क्लेम कसं करू शकता. आत्ता नाही तरी कधीच नाही. महाराष्ट्रामध्ये आमच्या पार्टीच्या बाहेरचा मुख्यमंत्री होणार नाही. तुम्हाला मुख्यमंत्रि‍पदावर क्लेम करायचा असेल तर तु्म्ही भाजपमध्ये विलीन व्हा. तुमचा मुख्यमंत्रि‍पदावरील क्लेम कायम राहील.'

...तेव्हा अमित शहांना भेटले नाहीत

आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत, असे सांगण्यासाठी शिंदे हे पहाटे चार वाजता अमित शहांना भेटले. बेळगावात मराठी माणसांवर होणारे हल्ले थांबवा, केंद्राने हस्तक्षेप करावा" हे सांगण्यासाठी शिंदे हे शहांना एवढ्या भल्या पहाटे नक्कीच भेटले नसावेत. कारण मराठी माणसांवरील हल्ले अद्याप सुरू आहेत, असे देखील राऊत यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.

Amit Shah, Eknath Shinde
Neelam Gorhe : मर्सिडीजचा 'आरोप' गोऱ्हेंना भोवणार? उपसभापतीपद घालवण्याचा ठाकरेंचा 'प्लॅन'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com