Eknath Shinde: मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले; नेमकं काय घडलं?

Chief Minister Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता.18) ते हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे यांच्यासोबत मार्गस्थ झाले होते.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Satara News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच धर्तीवर जागावाटपाचा फॉर्म्युला लवकरात लवकर निश्चित करण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठकांनी वेग पकडला आहे.

यातच आता महायुतीचे तीनही प्रमुख नेते अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार हे दिल्लीत दाखल झाले आहेत. पण दिल्लीला रवाना होण्यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे अपघातातून थोडक्यात बचावल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे मूळ गाव असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील दरे या गावात आले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता.18) ते हेलिकॉप्टरने पुण्याच्या दिशेने स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे आणि विशेष कार्य अधिकारी कवळे यांच्यासोबत मार्गस्थ झाले होते.

अचानक ढगाळ वातावरण झाले अन् मुसळधार पाऊस सुरू झाला.कोयना बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फूटपर्यंत हेलिकॉप्टर खाली आले होते. त्यामुळे काहीवेळ मुख्यमंत्री शिंदेंसह सर्वचजण टेन्शनमध्ये आले होते.

Eknath Shinde
MVA News : मविआत पटोले-राऊत वादाचा भडका; पवारांचा दिल्लीत फोन, तर ठाकरेंचीही आली पहिली प्रतिक्रिया

याचवेळी आजूबाजूच्या कोणत्याही एका शेतामध्ये हेलिकॉप्टर लँड करावे का? याबाबत पायलट आमच्याजवळ विचारणा करत होते.परंतु, त्या सोयीची कोणतीही जमीन आजूबाजूला नसल्याने आमचे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेने निघाले. जेथून आम्ही टेकऑफ घेतला होता, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लँड झाले आणि मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा मोटारीने पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

अशावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी होण्याची संभावना अधिक प्रमाणात असताना महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादामुळे मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण सुखरुप आहोत. या संपूर्ण प्रसंगादरम्यान वाचताना केलेल्या पुण्यकर्माची आठवण झाली. आता आम्ही पुण्याच्या दिशेने निघालो आहोत अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे.

Eknath Shinde
Sangola Politic's : साळुंखेंच्या हाती मशाल; गणपतआबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुखही घेणार मोठा निर्णय...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com