Sangola Politic's : साळुंखेंच्या हाती मशाल; गणपतआबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुखही घेणार मोठा निर्णय...

Dr. Babasaheb Deshmukh Vs Deepak Salunkhe : सांगोल्याच्या जागेबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आम्हाला आश्वस्त केलेले आहे, त्यामुळे सांगोल्याची जागा शेकापलाच सुटेल, अशी आम्हाला खात्री आहे. (स्व.) गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर धर्मनिरपेक्ष विचार जोपासला आहे.
Dr. Babasaheb Deshmukh-Deepak Salunkhe
Dr. Babasaheb Deshmukh-Deepak SalunkheSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 18 October : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले दीपक साळुंखे यांनी आज (ता. 18 ऑक्टोबर) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यात साळुंखे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यावरून महाविकास आघाडीत विशेषतः शेतकरी कामगार पक्षात खळबळ उडाली आहे. त्यावर शेकापचे सांगोल्याचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना ‘काहीही झाले तरी आम्ही सांगोल्यातून निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत,’ असे जाहीर केले आहे.

डॉ. बाबासाहेब देशमुख (Dr. Babasaheb Deshmukh) म्हणाले, चुकीच्या घटना होणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. काही चुकीच्या गोष्टी घडल्याच तर आमच्या पक्षाचे नेते भाई जयंत पाटील हे निर्णय घेतील, त्यानुसार आम्ही विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत ठरवू. आमच्यासोबत प्रागतिक विचारांचे पक्ष आहेत, त्या पक्षांसोबत आघाडी करून आम्ही निवडणूक लढविणार आहेत.

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी शेकापचे भाई जयंत पाटील हे चर्चा करीत आहेत. त्यात सांगोला, रायगड जिल्ह्यातील काही जागा आणि नांदेड जिल्ह्यातील कंधारची जागा मिळावी, अशी मागणी त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे केली आहे. त्या जागा आम्हाला न मिळाल्यास आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडून प्रागतिक पक्षांसोबत आघाडी करून निवडणूक लढवू, असेही डॉ. देशमुख यांनी नमूद केले आहे.

Dr. Babasaheb Deshmukh-Deepak Salunkhe
Ranjitsinh Mohite Patil : रणजितसिंह मोहिते पाटील पवारांची भेट न घेताच माघारी का गेले?

सांगोल्याच्या जागेबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आम्हाला आश्वस्त केलेले आहे, त्यामुळे सांगोल्याची जागा शेकापलाच सुटेल, अशी आम्हाला खात्री आहे. (स्व.) गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर धर्मनिरपेक्ष विचार जोपासला आहे. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा त्यांनी जपला आहे, याची जाणीव महाविकास आघाडीतील नेत्यांना आहे, त्यामुळे सांगोल्याची जागा शेकापला सुटेल, याची आम्हाला अजूनही आशा आहे, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

Dr. Babasaheb Deshmukh-Deepak Salunkhe
Sangola News: ठाकरेंच्या गुगलीने महाआघाडीत पुन्हा खळबळ; सांगोल्यात मशाल की शेकाप?

महाविकास आघाडीकडून आमच्याबाबत काही चुकीच्या गोष्टी होतील, असे आम्हाला वाटत नाही. मात्र, आमच्याबाबत काही चुकीच्या घटना घडल्याच तर आमचीही संपूर्ण तयारी आहे. आम्ही सांगोल्यातून विधानसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहोत, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आम्ही विधानसभेची निवडणूक लढविणार आहोत, असेही डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जाहीर केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com