Eknath Shinde On PM Modi : लेकाला मिळाली मोठी संधी, एकनाथ शिदेंनी केले PM मोदींचे अभिनंदन; म्हणाले 'तो' निर्णय...

Operation sindoor shrikant shinde Eknath Shinde : शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
CM Eknath Shinde praises PM Narendra Modi's decision to send an all-party delegation abroad after Operation Sindhuraksha.
CM Eknath Shinde praises PM Narendra Modi's decision to send an all-party delegation abroad after Operation Sindhuraksha.sarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : भारताची ऑपरेशन सिंदूर आणि दहशतवादा विरोधातील भूमिका जगाला सांगण्यासाठी भारताच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर पाठवले जाणार आहेत. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना देखील संधी मिळाली आहे. सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशात पाठवण्याच्या निर्णयाबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

शिंदे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, 'ऑपरेशन सिंदूरचाच एक भाग म्हणून भारताची दहशतवादविरोधी 'झिरो टॉलरन्स’ भूमिका अधिक प्रभावीपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळे वेगवेगळ्या राष्ट्रांना पाठवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून अभिनंदन करतो. ही भारताच्या परराष्ट्र धोरणातील एक ऐतिहासिक पायरी ठरणार आहे.'

CM Eknath Shinde praises PM Narendra Modi's decision to send an all-party delegation abroad after Operation Sindhuraksha.
Local Body Election: पाच वर्षातील सर्वात मोठा प्रश्न; नगरसेवक नसल्याने प्रश्न कोणाकडे मांडायचे? प्रशासनाचे अपयश!

'पहलगामचा माणुसकीला काळीमा फासणारा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरच्या काळात भारताने पाकिस्तानचा जगासमोर आणलेला आतंकवादाचा चेहरा हा कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा मोठा विजय आहे असं मी समजतो.', असे देखील शिंदे यांनी म्हटले आहे.

'शिष्टमंडळांमध्ये देशातल्या सर्व राजकीय पक्षांचा देखील समावेश केल्यामुळे दहशतवाद विरोधात देशाची एकजूट आहे हे चित्र दिसलं. संपूर्ण जगाला दहशतवादाची गंभीर समस्या आहे. याच्या विरोधात ठामपणे उभं राहण्यासाठी अशा रीतीने उचललेलं हे पाऊल जगभरात भारताची प्रतिमा एक जबाबदार, शांतताप्रिय आणि दहशतवाद विरोधात कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणारे राष्ट्र म्हणून उजळेल, असा मला विश्वास वाटतो.', असे देखील शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख नाही

एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशी पाठवण्याचे स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले आहे. हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. मात्र, शिष्टमंडळात श्रीकांत शिंदे यांना स्थान मिळाल्याबद्दल कोणताही उल्लेख त्यांच्या ट्विटमध्ये नाही.

CM Eknath Shinde praises PM Narendra Modi's decision to send an all-party delegation abroad after Operation Sindhuraksha.
Supreme Court : सरन्यायाधीश गवईंच्या शपथविधीनंतर दोन दिवसांत कणखर महिला न्यायाधीशांची निवृत्ती; निरोप वादात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com