Lok Sabha Election: 'या' मतदारसंघात महायुतीतील नेत्यांचे एकमत होईना, जागांचा तिढा सुटेना

Lok Sabha Election 2024 भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या तिन्ही पक्षांचा महायुतीमध्ये समावेश आहे. शिवाय सुरुवातीला युतीतील नेत्यांना वाटत होतं तितकं सोपं जागावाटप होताना दिसत नाही. त्यामुळे युतीतील 11 लोकसभा जागांचा फैसला अद्याप झालेला नाही.
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: महायुतीमधील (Mahayuti) जागावाटपाचा तिढा सुटला असून, लवकरच सर्व जागांवरील उमेदवारीजाहीर करू, असं महायुतीच्या नेत्यांकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्येक्षात मात्र युतीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये लोकसभेच्या बहुतांश जागांवर एकमत झाले असले तरी काही जागांवरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे.

एकीकडे शिवसेना (Shivsena) शिंदे गटाने त्यांच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत, तर दुसरीकडे हे उमेदवार आम्हाला मान्य नसल्याचं सांगत मित्रपक्ष भाजपने (BJP) काही उमेदवारांना कडाडून विरोध केला आहे. त्यामुळे काही जागांवरील उमेदवारही शिंदे गटाला बदलावे लागले आहेत, तर युतीत अशा काही जागा आहेत, जिथे अद्याप उमेदवारही जाहीर करण्यात आलेले नाहीत. कारण या जागांवरून मित्रपक्षांमध्येच रस्सीखेच सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गट या तिन्ही पक्षांचा महायुतीमध्ये समावेश आहे. शिवाय सुरुवातीला युतीतील नेत्यांना वाटत होतं तितकं सोपं जागावाटप होताना दिसत नाही. अनेक ठिकाणी उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाद असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे युतीच्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. महायुतीला अद्याप 11 लोकसभा जागांचा फैसला करता आलेला नाही. त्यामुळे या जागांवरून स्थानिक पातळीवरील अस्वस्थता कायम असून, तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात, याबाबतची उत्सुकता कायम आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Ekanath Shinde Group : उमेदवारी न मिळालेल्या खासदारांची धाकधूक वाढली

पुढील मतदारसंघात जागांचा तिढा कायम

मुंबई-कोकणवरून शिंदे सेना भाजपमध्ये रस्सीखेच

उत्तर-मध्य मुंबईमध्ये पूनम महाजन की आशिष शेलार (Ashish Shelar) की आणखी कोणी उमेदवार द्यायचा, याबाबतचा निर्णय भाजपला करता आलेला नाही. तसेच उत्तर-पश्चिम मुंबईची जागा भाजपकडे की शिंदे सेनेकडे हा प्रश्न कायम आहे, तर दक्षिण मुंबईची जागा मनसेला द्यायची, भाजपने लढायची की शिंदे सेनेला द्यायची हेही अद्याप ठरलेलं नाही. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर शिंदे सेनेचाच हक्क असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केले आहे, तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मतदारसंघात जोरदार शक्तिप्रदर्शन करत तेच उमेदवार असतील याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे ही जागा कोणाची याबाबत अस्पष्टता आहे.

शिंदेंच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा डोळा, तर सातारचा घोळ मिटेना

नाशिक (Nashik) महायुतीसाठी सर्वांत डोकेदुखीचा विषय झाला आहे. भाजप, शिंदे सेना, अजित पवार गट तिघांच्याही दावेदारीने या मतदारसंघात वाढलेले टेन्शन कायम आहे. तर शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजप अडला आहे, तिथे शिवसेना शिंदे गटानेही दावा केला आहे. दरम्यान, कल्याणमध्ये विद्यमान खासदार आणि मुख्यमंत्री शिंदेंचं पुत्र श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) उमेदवारी देण्यात अडचणी येत आहेत. पालघर, संभाजीनगरच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपमध्येही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तर उस्मानाबादची जागा भाजप आणि अजित पवार गटालाही हवी आहे. सातारची जागा भाजपकडे जाणार हे जवळपास स्पष्ट असले तरी अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या जागांवरचा तिढा कधी सुटणार, असा प्रश्न युतीतील इच्छुकांसह समर्थकांनाही पडला आहे.

(Edited By Jagdish Patil)

R

Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar
Shambhuraj Desai News : 'ठाण्याचा पालकमंत्री असलो तरी उमेदवार ठरवण्याचे काम मात्र...'; मंत्री शंभूराज देसाईंचं मोठं विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com