Eknath Shinde : काँग्रेस सोडलेला बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गुप्त भेट; भाजपच्या बालेकिल्ल्यात ताकद वाढणार?

Maharashtra political developments News : राज्याचे राजकारण तापलेले असतानाच आता काँग्रेसकडून निवडणूक लढविणारा एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
Eknath Shinde Sandipan Bhumare
Eknath Shinde Sandipan Bhumare Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसापासून ढवळून निघाले आहे. गेल्या महिनाभरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला दोन मोठे हादरे बसले. सुरुवातीला शिवसेनेने टायगर ऑपरेशन राबवत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार फोडले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे विश्वासून नेते व आमदार सचिन अहिर यांना विधानपरिषदेच्या उपसभापतिपदाची उमेदवारी दिली व बिनविरोध निवडून आणले. यामुळे राज्याचे राजकारण तापलेले असतानाच आता विदर्भातील काँग्रेसकडून निवडणूक लढविणारा व आता काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या एका बड्या नेत्याने एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार असलेले डॉ. अभय काशिनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीत तब्बल तासभर चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय ॲड. निलेश देशमुख हे देखील उपस्थित होते. अभय पाटील यांच्या या भेटीना राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अभय पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी भेटी दरम्यान यावेळी खासदार संजय जाधव, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय ॲड. निलेश देशमुख हे देखील उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Eknath Shinde Sandipan Bhumare
Mahayuti Politics: शिवसेनेच्या 4 बड्या नेत्यांनी पेटवला पुन्हा मुख्यमंत्री पदाचा मुद्दा, एका मंत्र्याचाही समावेश; महायुतीत वादाचा नवा अंक ?

अकोला लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभय पाटील यांनी 2024 ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. या निवडणुकीत अभय पाटील यांचा भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांनी 20 हजार 626 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत अभय पाटील यांना 4 लाख 16 हजार 404 मते घेतली होती. तर दुसरीकडे अनुप धोत्रे यांनी 4 लाख 57 हजार 30 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राहिलेले डॉ. अभय पाटील यांनी मराठा क्रांती मोर्चाचे प्रादेशिक समन्वयक म्हणूनही काम केले आहे. मात्र, जुलै 2025 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या या भेटीमुळे डॉ. अभय पाटील यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde Sandipan Bhumare
MahaYuti seat sharing : एकनाथ शिंदे-रवींद्र चव्हाण बैठकीत नेमके काय घडले? विधान परिषदेच्या 'त्या' एका जागेसाठी महायुतीत प्रचंड धुसफूस; थेट दिल्लीत धाव!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com