Shinde MLA fake voters : विरोधकानंतर आता सत्ताधारी आक्रमक; बोगस मतदारांवरून शिंदेंच्या आमदाराने निवडणूक आयोगालाच घेरले!

Eknath Shinde camp MLA News : बोगस मतदारांच्या मुद्यावरुन विरोधकांनी ऐकत येत मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तोंडावर असताना आता बोगस मतदारांच्या मुद्यावरुन विरोधकांनी ऐकत येत मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळेच सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करीत असताना आता या वादात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी बोगस मतदारांच्या मुद्यावरुन निवडणूक आयोगालाच घेरले आहे.

संजय गायकवाड यांनी थेट निवडणूक आयोगाची लाजच काढली आहे. निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे. आमच्याकडे 20 आणि 22 टक्के मतदान होते, असे म्हणत आमदार संजय गायकवाड (Sanajy Gaikwad) हे निवडणूक आयोगावर संतापले आहेत. अनेक नगरसेवकही मतदार याद्यात बोगस नावे टाकतायेत. निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमध्ये अनेक घोळ आहेत. 20 ते 30 वर्षापासून मृत व्यक्तिंची नावे मतदार यादीत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.

Eknath Shinde
BJP Vivek Kolhe : आम्ही सत्ताधारी पक्षात असलो, तरी..; विवेक कोल्हेंची खदखद

मतदारयादीतील घोळ आणि मतचोरीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक झाले आहेत. मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात काल (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. या मोर्चात बोलताना राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी मतचोरीच्या मुद्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

Eknath Shinde
Shivsena Politics : 'एकनाथ शिंदेंच महायुतीचा वाघ आणि म्हणूनच...'

दरम्यान, या मोर्चानंतर आता सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड हे देखील बोगस मतदार यादीच्या मुद्यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यांनी थेट निवडणूक आयोगाची लाजच काढली आहे. अनेक बोगस नावे मतदार यादीत येत असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत. त्यामुळं चांगली लोकं निवडणून येत नसल्याचे गायकवाड म्हणाले.

Eknath Shinde
Ajit Pawar NCP : शिंदेंचा अजित पवारांना तळकोकणात धक्का; उदय सामंतांचाही इशारा

जोपर्यंत मतदार याद्यातील घोळ व्यवस्थित होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी मोर्चावेळी विरोधकांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यातील घोळ आणि मतचोरीच्या मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Eknath Shinde
Uddhav Thackeray : धक्कादायक! उद्धव ठाकरेंचे नाव मतदारयादीतून काढण्याचा प्रयत्न; 'तो' अर्ज स्वतः वाचून दाखवला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com