Shivsena Politics : 'एकनाथ शिंदेंच महायुतीचा वाघ आणि म्हणूनच...'

Eknath Shinde Mahayuti Tiger : 'विरोधकांना आपला पराभव दिसत असल्यामुळे ते खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्या होत्या, त्यावेळी त्यांना यश मिळालं तेव्हा त्या मतदार याद्या चांगल्या होत्या. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून आता मतदारयाद्यांमध्ये त्यांना दोष दिसतोय.'
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Dhule News, 02 Nov : 'जेव्हा नदीच्या एका बाजूला लांडगे, कोल्हे, मांजरी असे षडयंत्र रचणारे एकत्र येतात तेव्हा समजूतदार माणसाला माहीती असतं की नदीच्या दुसऱ्या बाजूला नक्कीच वाघ किंवा सिंह उभा आहे.

एकनाथ शिंदे हे महायुतीचा वाघ आहेत आणि वाघ हा वाघ असतो', असं म्हणत शिवसेना नेते तथा मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. धुळ्यात विकासकामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी मतदार यादीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांवर टीका केली.

ते म्हणाले, 'विरोधकांना आपला पराभव दिसत असल्यामुळे ते खोटं नॅरेटिव्ह पसरवत आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत याच मतदार याद्या होत्या, त्यावेळी त्यांना यश मिळालं तेव्हा त्या मतदार याद्या चांगल्या होत्या.

Eknath Shinde
Sanjay Raut : 'पक्षासाठी खस्ता खाल्लेले मुंबईतील कार्यालयाच्या भूमिपूजनावेळी गैरहजर, व्यासपीठावर सर्व उपरे; मूळ भाजपवाल्यांना त्यांच्या सतरंज्या उचलण्याचे काम...'

विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला म्हणून आता मतदारयाद्यांमध्ये त्यांना दोष दिसतोय.' विधानसभेप्रमाणे आता देखील विरोधकांना आपला पराभव दिसत असल्यामुळेच ते नॅगेटिव्ह संभ्रम लोकांमध्ये परवण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधक करत आहेत.'

Eknath Shinde
Local Body Election : लागा तयारीला! बुधवारपासून आचारसंहिता, 15 डिसेंबरला जिल्हा परिषदेसाठी मतदान, तर महापालिका...; मोठ्या नेत्याने तारीखच जाहीर केली

दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी महायुती विरोधात एकत्र आलेल्या निवडणुकांमध्ये महायुती विरोधात एकत्र येणाऱ्या विरोधकांवर त्यांनी टीका करताना एकनाथ शिंदे हेच महायुतीचा वाघ असल्याचं वक्तव्य केलं.

ते म्हणाले, 'जेव्हा नदीच्या एका बाजूला लांडगे, कोल्हे, मांजरी असे षडयंत्र रचणारे एकत्र येतात. तेव्हा समजदार माणसाला माहिती असते की नदीच्या पलीकडल्या बाजूला नक्कीच वाघ किंवा सिंह उभा असतो. एकनाथ शिंदे हे महायुतीचा वाघ आहेत, वाघ हा वाघ असतो आणि म्हणूनच विरोधक खोटा अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com