Eknath Shinde : 'चाहिए पैसा, निकालो मोर्चा'; मुख्यमंत्री शिंदेंनी काढले वाभाडे

Winter Session 2023 : मोर्चा काढून केवळ सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला.
Eknath Shinde, Uddhav  Thackeray
Eknath Shinde, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील दोन्ही गटांकडून एकमेकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जात आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चामुळे मुंबईतील वातावरण ढवळून निघाले असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटांवर काढलेल्या मोर्चामुळे गंभीर आरोप करीत वाभाडे काढले आहेत. त्यामुळे आता या शिंदेंकडून करण्यात आलेल्या आरोपानंतर ठाकरे गटाकडून कशा प्रकारे खोडून काढला जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा महायुती सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प येथील दहा लाख नागरिकांच्या जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे या नागरिकांना नरकयातनेतून बाहेर काढले पाहिजे. त्यासाठी येत्या काळात हे काम लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने काम सुरु आहे. मात्र, काही जणांची 'चाहिए पैसा, निकालो मोर्चा', अशी परिस्थिती आहे. त्यामुळे मोर्चा काढून केवळ सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांचे नाव न घेता केला.

Eknath Shinde, Uddhav  Thackeray
Devendra Fadanvis : मराठा आरक्षण आंदोलनात किती गुन्हे दाखल; त्याचे पुढे काय झालं ? फडणवीस म्हणाले..

विधिमंडळ अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत काढण्यात आलेला हा मोर्चा केवळ फार्स होता. ही टेंडर प्रक्रिया करीत असताना महाविकास आघाडी सरकारने रद्द केली. सर्वांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आमच्या सरकारने घेतली असल्याचा पुनरुच्चार शिंदे यांनी केला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत टीडीआर प्रक्रिया पारदर्शक आहे. सहाशे एकराचा हा प्रकल्प आहे. सर्व सवलतीचा उल्लेख टेंडरमध्ये करण्यात आला होता. त्याबाबत अधिसूचना अद्याप उपलब्ध आहे. आमच्या सरकारवर आरोप करण्यापूर्वी कामाचे स्टेटस पहा मग आरोप करा, असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...तर हाच मोर्चा उलटा निघेल

अदानी यांना टेंडर देण्यास जर महाविकास आघाडी सरकरचा विरोध होता तर एवढेच विचारणा करतो की, आपल्या सरकारने ग्लोबल टेंडर का काढले, असा सवाल शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला. धारावीत निघालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी सडकून टिका केली. मुंबईमध्ये मोर्चा निघाला होता. मात्र, खरे कारण कळाले तर हाच मोर्चा उलटा निघणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

(Edited by Sachin Waghmare)

Eknath Shinde, Uddhav  Thackeray
Eknath Shinde : माझे कुटुंब माझी जबाबदारी लोकांनी फिरावे दारोदारी, टेंडर सोयऱ्याच्या घरी; शिंदेचा ठाकरेंना चिमटा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com