Shivsena UBT: शिवसेनेत पिक्चर अभी बाकी है... 6 खासदारांनंतर उद्धव ठाकरेंना अजून दोन मोठे हादरे? दोन मंत्र्यांचा खळबळजनक दावा

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Shiv Sena Split: उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांच्या संभाव्य फुटीनंतर आता आमदार आणि नगरसेवकही शिवसेनेत येतील, असा दावा शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी केला आहे.
Uday Samant, Shambhuraj Desai
Uday Samant, Shambhuraj DesaiSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 'ऑपरेशन टायगर'मुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षात उभी फूट पडून ६ खासदार शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र दिले असल्याचे सांगितले जाते. अशातच शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांनी लवकरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदारही फुटणार असल्याचा दावा केला आहे.

शंभूराज देसाई म्हणाले, सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता आहे. ज्याप्रमाणे खासदारांची नाराजी समोर आली तीच परिस्थिती आमदारांची आहे. पक्ष नेतृत्वाकडून कोणत्याही प्रकारचे पाठबळ मिळत नसल्याने आमदार लवकरच वेगळी भूमिका घेतील. मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांचा पाठपुरावा करण्यासाठी पक्ष नेतृत्व त्यांना कोणतीही मदत करत नाही. जनतेला काय उत्तर द्यायचे असा प्रश्न या आमदारांना पडला असल्याचे त्यांनी सांगितले.

Uday Samant, Shambhuraj Desai
Shivsena News: शिवसेनेचे 16 आमदार आणि 7 खासदार फुटणार? मातोश्रीवरुन धडकला नवा आदेश; 22 जूनला मोठा निर्णय होणार..?

'इनकमिंग' सुरूच राहणार

दरम्यान एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी देखील याला दुजोरा दिला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि काॅंग्रेसचे अनेक नगराध्यक्ष शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आतापर्यंत अनेक नगरसेवकांनी प्रवेश केले आहेत. कर्तृत्वावर आणि पक्षनेतृत्वावर विश्वास ठेवून लोक येत आहेत, त्यामुळे पक्षप्रवेश सुरूच राहणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

नगरसेवक पण फुटणार?

उद्धव ठाकरेंचे 6 खासदार शिवसेनेत दाखल झाल्यामुळे धक्का बसला आहे. अशात देसाई यांनी आमदार फुटणार असल्याचे सांगून खळबळ उडवून दिली. त्यापूर्वी खासदार नरेश म्हस्के यांनी मुंबईतील नगरसेवक तरी सांभाळून दाखवा, असे चॅलेंज केले आहे. त्यामुळे आता ठाकरेंचे मुंबईतील नगरसेवक पण फुटणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे. ठाकरेंचे मुंबई महापालिकेत ६५ नगरसेवक आहेत. त्यापैकी ३८ ते ४० नगरसेवक एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com