Eknath Shinde News: 'एकनाथ शिंदेंमुळेच राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता...'; सरकारमधील मंत्र्यांचं खळबळजनक विधान

Mahayuti Politics : 'आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जातात, तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. पण जे दिल्लीत जाऊन शेवटच्या रांगेत बसतात...'
Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpg
Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpgSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : इंडिया आघाडीत सहभागी झाल्यानंतर भाजपसह महायुतीमधील सर्वच पक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करीत असतात. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते यात सर्वाधिक आघाडीवर आहेत. उद्धव यांच्या बारीकसारीक हालचाली आणि घटना-घडामोडींवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते लक्ष ठेवून असतात.

राहुल गांधी यांनी दिल्लीत दिलेल्या मतदारयाद्यांवर प्रेझेंटशनला उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवले होते. यावरून पुन्हा एकदा शिंदेच्या शिवसेनेने त्यांना टार्गेट करणे सुरू केले आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.

उदय सामंत म्हणाले, आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जातात, तेव्हा ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात. पण जे दिल्लीत जाऊन शेवटच्या रांगेत बसतात, यावरून त्यांची कुवत आणि किंमत किती हे आता सिद्ध झाले असल्याचे सांगत पुन्हा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या शिवसेनेला डिवचले आहे.

अमरावती येथे एका कार्यक्रमासासाठी उदय सामंत आले होते. त्यांनी नागपूर विमानतळावरच पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ज्या योजना आणल्या, त्यामुळे एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली,हे कोणीच नाकारू शकत नाही याचा पुनरुच्चार केला.

Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpg
Rohit Pawar News : अजित पवारांनी जर 'तो' निर्णय घेतला, तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार...! रोहित पवारांचं मोठं विधान

यात भाजपला डिवचण्याचे किंवा वाद निर्माण करण्याचे कुठलेच कारण नाही. माझ्या वक्तव्यात कुठलाही विपर्यास करणारा शब्द नव्हता किंवा श्रेय घेण्यासाठी मी बोलत नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींसोबत राज ठाकरे युती करतील की नाही हे मला माहीत नसल्याचंही उदय सामंत यांनी सांगितलं.

पण युती झालीच तर राज ठाकरे हे राहुल गांधींना कधी ना कधी प्रश्न विचारतील की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुमची भूमिका काय ते असा टोला त्यांनी राज आणि उद्धव यांच्या संभाव्य युतीवर लगावला.

Eknath Shinde and Devendra Fadnavis .jpg
Manoj Jarange Patil : 'पोलीस बघून घेतील म्हणजे काय? तुम्हाला हल्ले घडवून आणायचेत का? जरांगे पाटील यांचा फडणवीसांना सवाल!

विधानसभा निवडणुकीत लोकांनी ठरवले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत लोकांनी ठरवलेले आहे. कोणाला निवडून द्यायचे त्यामुळे कोणी कितीही आघाड्या केल्या तरी काही फरक पडणार नाही. मत चोरले हे काँग्रेस आणि उद्धव सेनेला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमचेच सरकार येणार म्हणून महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न पडत असल्याचं होतं असा चिमटाही त्यांनी काढला.

काहींनी कोट शिवले होते. मात्र टांगा पलटी झाला. आता ईव्हीएम वरून आंदोलन सुरू आहे. ही महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची अॅक्टिव्हिटी असल्याचे सांगून उदय सामंत यांनी मतचोरीचा आरोप फेटाळून लावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com