Shivsena News : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतून बड्या नेत्याची हकालपट्टी; 'हे' आहे कारण

Shiv Sena leader expelled News : या निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde sarkarnama
Published on
Updated on

Nandurbar News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवले आहे. त्यामुळे महायुतीचे कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. त्यामुळे आता पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या नेतेमंडळींवर कारवाई केली जात आहे. विशेषतः या निवडणुकीत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराऐवजी अपक्ष उमेदवारांचा प्रचार करणाऱ्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. विधानसभा निवडणुकीत धडगाव अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखाने पक्षविरोधी काम केल्याने पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आली.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत धडगाव अक्कलकुवा मतदारसंघात महायुतीच्या वरिष्ठ स्तरावरील नेतृत्वाने विधान परिषद सदस्य आमश्या पाडवी यांना उमेदवारीसाठी संधी दिली होती. त्यांच्या विरोधात माजी खासदार तथा अपक्ष उमेदवार डॉ. हिना गावित यांनी बंडखोरी केली होती. या बंडखोर उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख किरसिंग वसावे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतली होती. त्यामुळे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी किरसिंग वसावे यांची पक्षातून हकालपट्टी केली.

Eknath Shinde
Eknath Shinde : मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दाखवले काळे झेंडे, लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा दावा

या निवडणुकीच्या कालावधीत किरसिंग वसावे यांनी भाजप (Bjp), शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महायुतीचे अधिकृत उमेदवार आमश्या पाडवी यांच्या प्रचार न करता अपक्ष उमेदवार हिना गावित यांचा प्रचार केला. यामुळे त्यांच्यावर पक्षविरोधी कामाचा ठपका ठेवण्यात आला होता.

Eknath Shinde
Dharashiv Politics Controversy : प्रताप सरनाईक 'अ‍ॅक्शन मोड'वर; तानाजी सावंतांच्या जिल्ह्याचे आरोग्य सुधारण्यासाठी घेतला मोठा निर्णय

धडगाव-अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष नेतृत्वाकडे याबाबत वारंवार मागणी केली होती. त्यानुसार, किरसिंग वसावे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतची माहिती शिवसेना संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली आहे.

Eknath Shinde
Dharashiv Guardian Minister: फडणवीसांनी सावंतांचा दबदबा असलेल्या धाराशिवची जबाबदारी दिली खरी, पण सरनाईकांसाठी तारेवरची कसरत?

अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी ग्रामीण रुग्णालयास जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. यावरून शिंदेंच्या शिवसेनेचे विधान परिषद आमदार आमश्या पाडवी व शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष किरसिंग वसावे यांच्यात श्रेयवादाची लढाई रंगली होती. त्यावेळी आमदार पाडवी यांनी जिल्हाध्यक्ष वसावे यांच्यावर जहरी टीका केली आहे. त्यानंतर आता त्यांची पक्षातून हाकलपट्टी केली आहे.

Eknath Shinde
Santosh Deshmukh Murder Case : 'मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील...', चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com