Shivsena News : काँग्रेसनेच वेळोवेळी लोकशाहीचा गळा घोटला; आकडेवारी सांगत एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

Eknath Shinde criticises Rahul Gandhi News : सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन सादर करावे या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केला.
eknath Shinde
eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या नेत्यामुळे कामकाज सुरळीत पार पडले नाही. सीजेपी आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे विरोधकांनी कामकाज बंद पाडले. सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन सादर करावे या मागणीसाठी विरोधकांनी गदारोळ केला. या सर्व प्रकारामुळे कामकाजच झाले नाही. हा सर्व घटनाक्रम ताजा असल्याने याच मुद्द्यावरून आकडेवारी सांगत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस काळातील कारभारच चव्हाट्यावर आणला आहे.

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी काँग्रेस पक्षावर लोकशाहीचा मुडदा पाडल्याचा गंभीर आरोप केला आहे. पंतप्रधानांवर देशात आणि परदेशातही सातत्याने आरोप करणे, ही जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका नसल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा उंचावली असून, अनेक देशांकडून त्यांना सर्वोच्च पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, ही प्रगती विरोधकांना पाहावत नाही, अशी टीका त्यांनी केली. विरोधकांनी रचनात्मक चर्चा करण्याऐवजी पळवाट शोधल्यामुळेच त्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती त्यांना वाटते, अशी टीका यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली.

eknath Shinde
Parliament Session : घमासान सुरू असतानाच लोकसभेत PM मोदी-शाह अन् राहुल गांधी समोरासमोर; अध्यक्षांकडून अनिश्चित काळासाठी कामकाज स्थगित

काँग्रेसच्या (Congress) भूतकाळातील कृतींवरही एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्ला चढवला. १९६७ ते १९७१ या चार वर्षांत काँग्रेसने तब्बल ४५ सरकारे पाडली आणि १६ वेळा राष्ट्रपती राजवट लागू केली. तसेच, १८०० आमदार फोडून ११५ जणांना मंत्रिपदे दिली, असे आकडेवारीसह त्यांनी सांगितले.

eknath Shinde
Parliament debate : राहुल गांधींनी स्वत:लाच सापळ्यात अडकविले..! थेट अमित शहांना भिडल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांचा पारा चढला

काँग्रेसने वेळोवेळी लोकशाहीचा गळा घोटला असून, दुसऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी त्यांनी स्वतःच्या कारभाराकडे पाहण्याची गरज आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ठामपणे नमूद केले. विरोधकांनी रचनात्मक चर्चा करण्याऐवजी पळवाट शोधल्यामुळेच त्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती त्यांना वाटत असल्याची टीका शिंदे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com