Balasaheb Thackeray birth centenary : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; म्हणाले, 'त्यांचा 'हा' संकल्प...'

Shiv Sena ideology News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. शिवसेना हा सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठे करणारा पक्ष राहिला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात चांदा ते बांदा शिवसेना पोहचविण्याचा प्रयत्न आमचा राहिला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्ट करीत बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प पूर्ण करण्याचा निर्धार शिंदेंनी व्यक्त केला.

बाळासाहेब ठाकरेंचे जे स्वप्न होते ते स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. त्यामध्ये अयोध्येत राममंदिर बांधण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यासोबतच काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा निर्णय पीएम मोदी यांनी घेतला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा सार्थ अभिमान वाटत असल्याचे शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.

CM Eknath Shinde
BJP News : संभाजीनगर महापालिकेच्या कारभारासाठी भाजपाला हवा अनुभवी चेहरा; औताडे, राजूरकर, वानखेडे, दांडगेंच्या नावाची चर्चा...

त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काही घोषणा केल्या आहेत. त्यामध्ये येत्या काळात मुंबई महापालिकेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray)आरोग्य आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात पसरत असलेल्या विविध आजारांना आळा घालण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच मुंबई महापालिकेच्या बजेटमधून विविध आरोग्य योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

CM Eknath Shinde
NCP vs Shivsena : निवडणुकीनंतर पुण्यात राष्ट्रवादी अन् शिवसेनेतील हिंसाचार उफाळला, शिंदेंच्या नेत्याच्या अंगावर गाडी घातली, डोक्यात दगड अन्...

त्यासोबतच राज्यातील गडकोट किल्ला परिसराची स्वच्छता व पाण्याची सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी गडकोट किल्ला परिसरात हे अभियान राबविण्यात येणार आहे. नगरविकास विभागाकडून राज्यातील 29 महापालिका व 394 नगरापलिकासाठी अभियान राबविण्यात येणार आहे. त्यासोबतच शाळा व शिक्षणासाठी मदत करण्यात येणार आहे. त्यासोबतच चांगल्या शाळांना बक्षीस देण्यात येणार आहे.

CM Eknath Shinde
NCP Vs BJP : अजितदादांना भाजपवरची टीका महागात पडली? CM फडणवीसांनी पुणे-पिंपरी चिंचवडचा बदला रायगडमध्ये घेतला, भरत गोगावलेंना लॉटरी

महिला बचतगट सक्षम करण्यासाठी नगरविकास खात्याच्या माध्यमातून मोठी मदत करणार आहोत. मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. परिवहन महामंडळाकडून सहलीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

CM Eknath Shinde
Congress Politics : कुठे आघाडी, कुठे साटलोटं? काँग्रेसच्या रणनीतीनं कार्यकर्ते संभ्रमात, जिल्हा परिषद निवडणुकीत नेत्यांची परीक्षा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com