BJP News : संभाजीनगर महापालिकेच्या कारभारासाठी भाजपाला हवा अनुभवी चेहरा; औताडे, राजूरकर, वानखेडे, दांडगेंच्या नावाची चर्चा...

Chhatrapati Sambhajinagar Mayor : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडीसाठी भाजप अनुभवी चेहऱ्याच्या शोधात असून औताडे, राजूरकर, वानखेडे, दांडगे यांची नावे चर्चेत आहेत.
Vilas Autade, Sameer Rajurkar, Rajgaurav Wankhede and Shivaji Dandge, whose names are being discussed as strong contenders for the Mayor’s post
Vilas Autade, Sameer Rajurkar, Rajgaurav Wankhede and Shivaji Dandge, whose names are being discussed as strong contenders for the Mayor’s post in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation after BJP’s clear majority.Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar MahaPalika News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणल्यानंतर आज महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाले. सर्वसाधारण प्रवर्गातून होणाऱ्या महापौर पदाच्या निवडीसाठी भाजपामध्ये मोठी स्पर्धा असणार आहे. परंतु महापालिकेचा अभ्यास, सभागृहात होणाऱ्या निर्णय, ठरावाची पद्धत, नियम आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची हातोटी असणाऱ्या अनुभवी चेहऱ्याचा पक्ष शोध घेत आहे. या स्पर्धेत विजय औताडे, समीर राजूरकर, राजगौरव वानखेडे, शिवाजी दांडगे यांची नावे चर्चेत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. यामुळे निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची ओरड पक्षात झाली. शिवसेनेसोबत युती तुटली तरीही तिकीट वाटपावरून भाजपमध्ये मोठी नाराजी, बंडखोरी पहायला मिळाली होती. मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर, शहर-जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्याविरोधातील रोषही रस्त्यावर उमटला होता. त्यानंतरही भाजपने स्वबळावर 57 नगरसेवक निवडून आणले. आता महापौर पदावर नेमकी कोणाची वर्णी लागणार? याची उत्सूकता आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित झाल्याने पक्षात मोठ्या प्रमाणात लाॅबिंग सुरू झाले आहे. परंतु पक्षाने महापौर पदासाठी अनुभवी चेहऱ्याला संधी देण्याचे ठरवले आहे. यात प्रामुख्याने भाजपकडून तीन टर्म नगरसेवक असलेले विजय औताडे, एकदा मनसे आणि त्यानंतर दोन वेळा भाजपकडून निवडून आलेले राजगौरव वानखेडे, दोनवेळा शहरातील उच्चभ्रू प्रभागातून निवडून आलेले आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे समीर राजूकर यांचेही नाव यामध्ये चर्चेत आहे.

या शिवाय शिवाजी दांडगे हे मंत्री अतुल सावे यांचे कट्टर समर्थक असलेले शिवाजी दांडगे यांच्या नावावर पक्षात चर्चा होऊ शकते, असे बोलले जाते. या शिवाय महेश माळवदकर हे भाजपचे सर्वात अनुभवी नगरसेवकांपैकी एक आहेत. त्यांच्याही नावाचा पक्षात विचार होऊ शकतो, असे बोलले जाते.

कोण कोणाच्या गटाचा?

या चार नावांपैकी विजय औताडे, राजगौरव वानखेडे हे भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. विजय औताडे यांना यापुर्वी पक्षाने उपमहापौर पदावर संधी दिली होती. तर राज गौरव वानखेडे हे 2005 मध्ये मनसेकडून निवडून आले होते. 2010 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि दुसऱ्यांदा नगरसेवक झाले. त्यांची ही तिसरी टर्म आहे. ते देखील रावसाहेब दानवे यांचे समर्थक आहेत.

Vilas Autade, Sameer Rajurkar, Rajgaurav Wankhede and Shivaji Dandge, whose names are being discussed as strong contenders for the Mayor’s post
Mayor Reservation : महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर, पुण्यात महिलाराज तर मुंबईत..., 29 महापालिकांची संपूर्ण यादीच वाचा

समीर राजूकर यांना महापालिकेचा चांगला अभ्यास आहे. समर्थनगर या उच्चभ्रू वसाहतीतून ते दोनवेळा निवडून आले आहेत. भाजप नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. तर शिवाजी दांडगे हे मंत्री अतुल सावे यांचे कट्टर समर्थक आहेत.

Vilas Autade, Sameer Rajurkar, Rajgaurav Wankhede and Shivaji Dandge, whose names are being discussed as strong contenders for the Mayor’s post
Chhatrapati Sambhajinagar News : बाल सुधारगृहातील मुलींचे पलायन प्रकरणी जिल्हा बालविकास अधिकारी निलंबित!

राजु वैद्य अनुभवी पण...

महापालिका निवडणुकी दरम्यान, पाच टर्म नगरसेवक, दोनवेळा स्थाया समिती सभापती, सभागृह नेता असलेल्या राजु वैद्य यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मंत्री अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघात वैद्य यांचा प्रभाग येतो. भाजप प्रवेशानंतर पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले. शिवसेनेत असताना महापालिकेत राजू वैद्य यांनी अनेक पद भुषवलेली असल्यामुळे त्यांना सभागृहातील कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून आलेल्या राजु वैद्य यांना भाजपकडून थेट महापौर पदाची संधी मिळणे तसे अवघडच वाटते. त्यांच्या नावाला पक्षातील निष्ठावंताचा विरोध होऊ शकतो, असेही बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com