Eknath Shinde News : पुण्यातील अपघातप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंच मोठं विधान; म्हणाले, दोषींवर कठोर...

Pune Hit And Run Case News : पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. या अपघात प्रकरणाची पोलीस अधिकारी चौकशी करीत असून यामध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
Cm Eknath Shinde News
Cm Eknath Shinde NewsSarkarnama

Pune Accident News : पुण्यातील कल्याणीनगर भागात बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने पोर्श या महागड्या कारने दोघांना धडक दिली. यामध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या दोन अभियंत्यांच्या जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर राजकारण तापले असून पोलिसांनी कारवाईत दिरंगाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या पुण्यातील अपघात प्रकरणाची पोलीस अधिकारी (Police Officer)चौकशी करीत असून यामध्ये दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. (Eknath Shinde News )

Cm Eknath Shinde News
Ambadas Danve News : 'खोटा गुन्हा दाखल झाला असेल तर...'; अंबादास दानवेंच्या आवाहनाचा गर्भित इशारा काय?

मुंबईतील नाले सफाईच्या कामाची मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी पहाणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हार्डबेस लागेपर्यंत नाले सफाई करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

मुंबईतील नाले सफाईचे काम वेगाने सुरु आहे. त्यासोबतच नाले सफाईवरून आमची कोणासोबतही श्रेयवादाची लढाई नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निकाल लागल्यानंतर 'दूध का दूध' होईल

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून सत्ताधारी व विरोधी पक्षाकडून दावे-प्रतिदावे केली जात असली तरी त्यावर आताच बोलणे उचित ठरणार नाही. येत्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर 'दूध का दूध' होईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, मुंबई महापालिकेने पावसाळा पूर्वीच्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी प्रत्येक ठिकाणी जावून तेथील नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत अनेक नेते देखील उपस्थित आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाययोजना सुरु आहेत. पावसाळ्यात पाणी तुंबता कामा नये एवढी नालेसफाई गरजेची असून या नालेसफाईच्या कामाला नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Cm Eknath Shinde News
Eknath Shinde : 'मराठवाड्यातील पाणीपातळी वाढवण्यासाठी 'NGO'ची मदत घेणार' ; मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय!

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com