Sudhir Mungantivar News : 'एकनाथ शिंदेंचं 'सीएम'पद भाजपमुळेच'... मुनगंटीवारांचा नेमका दावा काय?

Ncp Political : जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने केली असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
Eknath Shinde, Sudhir Mungantvar
Eknath Shinde, Sudhir Mungantvar Sarkarnama

Bjp Political News : लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदलले जाणार, अशा अफवा पसरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यावर बोलताना भाजपचे नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केले असल्याचे सांगून विरोधकांच्या आरोपातील हवाच काढली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यामुळे अशा मदत करणाऱ्यांबरोबर कधीच भाजप फारकत घेत नाही. एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्री केले आहे. एकनाथ शिंदे यांनी ते पद कधीच आम्हाला मागितले नव्हते. त्यामुळे त्यांच्यासोबत फारकत घेतलेली नाही, असेही यावेळी बोलताना स्पष्ट करीत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली.

Eknath Shinde, Sudhir Mungantvar
Jitendra Awhad News: 'मनुस्मृती'वरून वाद, जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट येणार? अजित पवार गट वचपा काढणार, माफीनाम्यानंतरही अटकेची मागणी!

महाड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्यावरून सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यातच आता या प्रकरणावरून भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी साधला निशाणा साधला आहे.

या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar ) गटाचा खरा चेहरा उघडा पडला आहे. संविधान ज्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले, त्यांचा फोटो फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. कधी काँग्रेस फोडायची तर कधी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अशी कृती करत नंतर सांगायचे. मुळात बाबासाहेबांबाबत अशी कृती मान्यच नाही. या प्रकरणात कारवाई केली पाहिजे, असा इशारा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ही चूक म्हणत कातडी वाचवता येणार नाही. महाराष्ट्र अशा घटनेला कधी माफ करणार नाही. सरकारने सुद्धा अशाप्रकारची चूक भविष्यात घडू नये, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या वक्तव्याबाबत बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, त्यांना असे म्हणावे लागेल, नाहीतर ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नजरेत फेल होतील. त्यांनी आकडेवारी द्यावी. काँग्रेस काळात किती दोष सिद्धी होते. काँग्रेस काळात आरोपी सुटायचे. आमच्या काळात ते ५२ टक्क्यांवर गेले आहेत. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यासाठी असे आरोप केले जात आहेत.

Eknath Shinde, Sudhir Mungantvar
Jitendra Awhad News : '...तर सगळी मनुस्मृती अभ्यासक्रमात येईल', जितेंद्र आव्हाडांचा दावा

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com