Jitendra Awhad News: 'मनुस्मृती'चा वाद, आव्हाडांच्या अंगलट येणार? अजित पवार गट वचपा काढणार, माफीनाम्यानंतरही..!

Ajit Pawar Group On Jitendra Awhad: "जितेंद्र आव्हाड हे नाटककार आहेत. त्यांचे खाली डोके वरती पाय अशी स्थिती झालेली आहे. मनुस्मृती जाळायला गेले आणि फाडून आले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो."
Ajit Pawar, Jitendra Awhad, Manusmriti
Ajit Pawar, Jitendra Awhad, ManusmritiSarkarnama

Ajit Pawar Group On Jitendra Awhad: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज (बुधवारी) महाडमध्ये (Mahad) मनुस्मृतीचे दहन केलं. तसंच मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश झाला तर उमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा देणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मात्र, या आंदोलनावेळी त्यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांचा (Babasaheb Ambedkar) फोटो फाडला गेला. त्यावरून विरोधकांनी आव्हाडांना टार्गेट केलं आहे. तर बाबासाहेबांचा अवमान करणार्‍या आव्हाडांना अटक करा अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे.

महाड येथे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्यांचा अवमान करणार्‍या जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Eknath Shinde and Devendra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे व प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली. जितेंद्र आव्हाड हे नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार आहेत. आज त्यांनी परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले. त्यामुळे त्यांच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ajit Pawar, Jitendra Awhad, Manusmriti
Eknath Shinde News: मुख्यमंत्री शिंदेंनी धाडली मानहानीची नोटीस, संजय राऊत म्हणतात, 'अब आयेगा मजा...!'

मनुस्मृतीचा (Manusmriti) विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यपुस्तकात येणार नाहीत अशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. परंतु, ज्यांना नाटकं करायची सवय आहे. ते आंदोलन करायला महाडला गेले आणि त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. बाबासाहेबांच्या अवमानप्रकरणी महाड (Mahad) येथील पोलिस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह त्यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी, असी मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांना दिली.

आव्हाडांचा खरा चेहरा समोर आला

जितेंद्र आव्हाड हे नाटककार आहेत. त्यांचे खाली डोके वरती पाय अशी स्थिती झालेली आहे. मनुस्मृती जाळायला गेले आणि फाडून आले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो. स्वतःला पुरोगामी म्हणायचं आणि असं कृत्य करायचे हे अशोभनीय आहे. आज त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी दिली.

Ajit Pawar, Jitendra Awhad, Manusmriti
Raju Shetti News : मुख्यमंत्री शिंदेंसह मंत्र्यांना राजू शेट्टींचा इशारा; नेमकं कारण काय?

आज मी माफी मागतोय...

दरम्यान या सर्व प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी आपली भूमिका स्पष्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये म्हटलं आहे, "शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचां समावेश करण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे.याचा विरोध म्हणून आज महाड येथील क्रांती स्तंभ येथे मनुस्मृतीचे दहन करून याचा निषेध केला. हे करत असताना अनवधानाने माझ्याकडून एक मोठी चूक घडली. मनुस्मृतीचे निषेध करणारे पोस्टर्स काही कार्यकर्त्यांनी आणले होते. त्यावर बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील चित्र होते. मनुस्मृती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधाने फाडण्यात आले.मी याबद्दल जाहीर माफी मागतो.

गेली अनेक वर्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा मी प्रयत्न करत असतो ही बाब सगळ्यांना माहिती आहे. डॉ.बाबासाहेबांचा माझ्याकडून अनवधानाने झालेला हा अवमान माझ्यादेखील जिव्हारी लागलेला आहे. मी आजवर कोणत्याच बाबींवर माफी मागितलेली नाही. मी कायमच माझ्या भूमिकेवर ठाम राहून ती निभावलेली आहे. मात्र आज मी माफी मागतोय, कारण हा माझ्या बापाचा अवमान माझ्याकडून झालेला आहे. सर्व आंबेडकर प्रेमी मला माफ करतील, हा विश्वास आहे."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com