Eknath Shinde News : शिंदेंच्या आमदारांची उघड-उघड नाराजी ; मुख्यमंत्र्यांपुढेच वाचला मित्रपक्षांच्या तक्रारींचा पाढा

Politcal News : बैठकीत एकनाथ शिंदेंच्या आमदारांनी या सर्व प्रकाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर उपस्थित मंत्री व आमदारांनी महायुतीमधील मित्रपक्षाच्या तक्रारीचा पाढाच वाचला आहे.
CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde, DCM Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महायुतीमधील घटक पक्षाचे संबंध गेल्या काही दिवसापासून लोकसभेच्या जागावाटपावरून चांगलेच ताणले गेले आहेत. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मागितलेल्या जागा मिळत नसल्याने नाराजी समोर आली आहे. विशेषतः तीन खासदारांची उमेदवारी कापण्यात आल्याने शिंदे सेनेतील आमदारांची खदखद समोर आली आहे.

शनिवारी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदेंच्या (Eknath shinde) आमदारांनी या सर्व प्रकाराबाबत उघड नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर उपस्थित मंत्री व आमदारांनी महायुतीमधील (Mahayuti) मित्रपक्षाच्या तक्रारीचा पाढाच वाचला आहे. (Eknath Shinde News)

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
Loksabha Election 2024 : मुलाचा पराभव केलेल्या बारणेंचा प्रचार करण्याची अजितदादांवर वेळ...

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत नाशिक, ठाणे, रत्नागिरी सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नये यासाठी ठाम भूमिका घ्यावी, अशी मागणी या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यासोबतच परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन युतीधर्म आपण पाळला. पण आपले मित्रपक्ष युतीधर्म प्रामाणिकपणे पाळत आहेत का? असा सवाल उपस्थित केला.

यावेळी मुख्यमंत्री शिंदेनी मंत्री व आमदारांची समजूत काढली. जागवतो करीत असताना काही तडजोडी कराव्या लागतात, पण खासदारांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका घेतली असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगत नाराज झालेल्या मंत्री व आमदारांची समजूत काढली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकसभा निवडणूकीच्या संदर्भात कोणते मतदारसंघ आपल्याकडे असावेत, यावर चर्चा केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हे मतदारसंघ अजिबात सोडू नका

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या आमदारांनी या मुद्द्यावर चर्चा केली. शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी आणि आमदारांनी बैठकीत नाराजीला वाचा फोडली. धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळं मिळाली असं मत अनेक आमदारांनी व्यक्त केले. महायुतीमध्ये आपलं महत्त्व कमी होत नाही, असे मत या आमदारांनी बैठकीत मांडले.

परभणी, उस्मानाबाद, रायगड, शिरूर हे मतदारसंघ आपल्या हक्काचे असतानाही मित्रपक्षाला देऊन आपण अपमान गिळून प्रचार सुरू केला आहे व आता ठाणे, नाशिक, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पालघर मतदारसंघ अजिबात सोडू नये, असे या आमदारांनी म्हटले असल्याचे समजते.

त्यांचे पुनर्वसन योग्य प्रकारे करणार

महायुतीमध्ये तीन पक्ष एकत्र येतात. त्यावेळी काही शेअर द्यावा लागतो. तक्रार करण्यापेक्षा युती धर्म पाळावा. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे. भाजप हा मोठा भाऊ असल्यामुळे त्याने एक दोन जागा जास्त लढवल्या तर फरक पडत नाही. ज्यांना आपण तिकिट दिली नाही, त्यांचे पुनर्वसन योग्य प्रकारे केले, जाईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis
Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : "4 ते 5 खासदार ठाकरे गटात येण्यासाठी रडत आहेत, मुख्यमंत्र्यांचेही डोळे पाणावलेत"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com