Loksabha Election 2024 : मुलाचा पराभव केलेल्या बारणेंचा प्रचार करण्याची अजितदादांवर वेळ...

Shrirang Barne मावळमधील महायुतीची एकत्रित अशी पहिलीच बैठक सोमवारी (ता. ८) होत आहे.तेथे त्यांचे श्रीरंग बारणे (शिंदे शिवसेना) उमेदवार आहेत.
Shrirang Barne, Ajit Pawar
Shrirang Barne, Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Pimpari News : राजकारणात काहीही त्यातही शेवटच्या क्षणी काय घडेल, याचा नेम नसतो. ते साऱ्या महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात पाहिले,अनुभवले. राजकारणात कुणीही कायम कुणाचा शत्रू वा मित्र राहत नसतो, हे ही तितकेच खरे आहे.त्याची अनुभती परवा (ता. ८)पिंपरी-चिंचवडकरांना येणार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष लागले आहे.

मावळमधील महायुतीची एकत्रित अशी पहिलीच बैठक सोमवारी (ता.८) होत आहे. तेथे त्यांचे श्रीरंग बारणे (शिंदे शिवसेना) उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचार नियोजनाच्या या बैठकीला युतीतील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री भाजपचे चंद्रकांत पाटील असे दोन दादा मार्गदर्शन करणार आहेत.

अजित पवारांचे पूत्र पार्थ यांचा गतवेळी २०१९ ला बारणेंनी सव्वादोन लाख मतांनी दणदणीत केलेला पराभव त्यांनाच नाही,तर संपूर्ण पवार कुटुंबाला झोंबला. कारण त्या कुटुंबातील सदस्याचा तो एवढा मोठा पहिलाच पराजय होता.मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मुलाचा पराभव केलेल्या बारणेंच्या प्रचारासाठी तथा विजयासाठी येण्याची पाळी अजित पवारांवर आली आहे.

Shrirang Barne, Ajit Pawar
Maval Lok Sabha Constituency : पुणे, शिरुर नंतर आता 'मावळ' मध्येही होणार 'वंचित'ची एंट्री!

गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले मित्र बनले. तर, मित्र हे शत्रू झाले. शिवसेना, भाजपच्या युती सरकारमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी सामील झाली. त्यामुळे राजकारण पुन्हा फिरले. जानी दुश्मन नेते एक झाले. त्यातूनच मावळमध्ये बारणेंचा प्रचार करण्याची वेळ अजितदादांवर आता आली आहे. दुसरीकडे नेते एक झाले, पण त्यांच्या कार्यकर्त्यांची एकत्र येताना गोची झाली. सहजासहजी त्यांच्या हे पचनी पडलेले नाही. पण,नेतेच एकत्र आल्याने त्यांना मनोमिलनाशिवाय पर्याय राहिला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारणेंच्या प्रचाराचा शिलेदारांनाही आदेश

अजितदादांनी आपल्या शिलेदारांनाही बारणेंच्या प्रचारात उतरण्याचे आदेश दिले आहेत. निवडून आणण्यासाठी ताकद लावण्यास सांगितले आहे. त्याला त्यांच्या पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दुजोरा दिला. कालच अजितदादांच्या सुचनेनुसार शिंदे शिवसेनेतून आलेले,पण उमेदवारी न मिळाल्य़ाने नाराज झालेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मावळचे अजितदादांचे समर्थक आमदार सुनील शेळकेच नाही, तर खांडगेसारखे त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही आता बारणेंचे काम करावे लागणार आहे.

Edited By : Umesh Bambare

Shrirang Barne, Ajit Pawar
Maval Lok Sabha Constituency : प्रचार आला घाटावर, युती, आघाडीचा आता थेट प्रचार झाला मावळमध्ये सुरू !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com