Shivsena News : शिंदेंच्या शिवसेना मेळाव्याला 'या' दोन बड्या नेत्यांनी ठरवून मारली दांडी ?

Shivsena Melava News : मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडला. वांद्रे कुर्ला संकुलात हा मेळावा पार पडला.
Ekanath Shinde Shiv sena
Ekanath Shinde Shiv senaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मेळावा पार पडला. वांद्रे कुर्ला संकुलात हा मेळावा पार पडला. शिवसेना शिंदे गटाकडून बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस 23 जानेवारी विजयोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जोरदार भाषण करीत विरोधकावर सडकून टीका केली. दुसरीकडे शिवसेनेच्या या मेळाव्याला दोन बड्या नेत्यांनी दांडी मारली, याची चर्चा रंगली होती.

गेल्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेले तानाजी सावंत व माजी मंत्री अब्दुल सत्तार हे नाराज असलेले दोन मंत्री मेळाव्याला उपस्थित नव्हते. गेल्या काही दिवसापासून हे दोघे जण नाराज असल्याचे समजते. त्यानंतर सावंत यांनी अधिवेशनाला देखील दांडी मारली होती. त्यामुळे मेळाव्याप्रसंगी या दोघांच्या नाराजीची चर्चा रंगली होती.

Ekanath Shinde Shiv sena
Balasaheb Thackeray Today Birthday: महाराष्ट्राला मी महान बनवू शकतो!...हे सारं घडलं होतं बाळासाहेब ठाकरे या माणसामुळं!

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन झाले. यावेळी एकनाथ शिंदे (Ekanth shinde) यांनी शिवसेनेतील तीन मंत्र्यांना वगळून नवीन चेहऱ्याना संधी दिली होती. वगळण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये दीपक केसरकर, तानाजी सावंत व अब्दुल सत्तार यांचा समावेश होता. गेल्या काही दिवसापासून नाराज असलेले सावंत पक्षाच्या कुठल्याच कार्यक्रमाला हजेरी लावत नाहीत. दुसरीकडे मतदारसंघात जात नसल्याची चर्चा आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Eknath Shinde: स्वबळाचा नारा देणाऱ्या ठाकरेंना शिंदेंनी डिवचले; म्हणाले, 'घरी बसून निवडणूक ...'

दरम्यान, माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे सध्या पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या चर्चा सुरू होण्यास कारणीभूत ठरली आहे सावंत यांनी दिलेली एक जाहिरात. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंत यांनी एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीतून चक्क शिवसेना पक्षाचे चिन्ह असलेला धनुष्यबाण गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्यासाठी हीच आहे का योग्य वेळ?

शिवसेना पक्ष फुटीनंतर आमदार तानाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी दिलेली भक्कम साथ पाहता शिंदेंनी त्यांना मागील सरकारमध्ये महत्त्वाच्या अशा आरोग्य खात्याची जबाबदारी दिली होती. मात्र, ते सावंत आरोग्य मंत्री असताना त्यांच्या काही वक्तव्यांवरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचा सध्याच्या महायुती सरकारमधील मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही आणि त्यामुळेच तानाजी सांवत (Tanaji Sawant) हे नाराज असल्याचं बोललं जात होतं. अशातच आता त्यांनी दिलेल्या जाहिरातीमध्ये शिवसेनेचे चिन्ह असलेला धनुष्यबाण गायब आहे.

Ekanath Shinde Shiv sena
Eknath Shinde: स्वबळाचा नारा देणाऱ्या ठाकरेंना शिंदेंनी डिवचले; म्हणाले, 'घरी बसून निवडणूक ...'

दरम्यान, यावेळी बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला. कधी सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचवेळी बाळासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्र फडणवीस सीएम आहेत. मी डीसीएम आहे. डीसीएम म्हणजे डेडीकेटेड टू कॉमन मॅन, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

Ekanath Shinde Shiv sena
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंकडे शिवसेनेचं नेतृत्व देण्यासाठी हीच आहे का योग्य वेळ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com