Harshavardhan Patil : अखेर हर्षवर्धन पाटलांचा भाजपला रामराम; शरद पवारांना साथ देण्याची घोषणा

NCP BJP Assembly Election : हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर ही घोषणा केली आहे.
Harshavardhan Patil
Harshavardhan PatilSarkarnama
Published on
Updated on

Pune News : भाजपचे नेते व माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी भाजपला रामराम ठोकत असल्याचे जाहीर केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी घोषित केले. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. ते म्हणाले, फडणवीस यांनी माझ्यासमोर पर्याच ठेवला होता. पण दुसरा पर्याय स्वीकारणे व्यक्तिगत माझ्यासाठी संयुक्तिक ठरला असता. पण राजकारणात जनतेचा प्रश्न असतो. त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर शरद पवारांचा निरोप आला. त्यानुसार भेट झाली. यापूर्वी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीतही त्यांनी माझ्या राजकीय भूमिकेबाबत विचारणा केली होती.

Harshavardhan Patil
Harshavardhan Patil : फडणवीसांच्या संमतीनेच हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार; कार्यकर्त्यांना सगळं सांगितलं...

शरद पवार यांच्या घरी बैठकीला सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. या दोघांनीही पक्षात येण्याचा आग्रह धरला. त्यानुसार मी इंदापुरला जाऊन कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेईन, असे सांगितले. आज कार्यकर्त्यांशी बोललो, त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जावे, असा आग्रह केला. त्यानुसार आज मी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय जाहीर करत आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

Harshavardhan Patil
Ankita Patil : अंकिता पाटलांचा भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाचा आजच राजीनामा

आज मी, अंकिता पाटील आणि सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. माझ्या पक्षप्रवेशाबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे निर्णय घेतील, असेही पाटील यांनी सांगितले. तालुक्यातील शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधावर बोलताना त्यांनी आपल्याला याबाबत माहिती नसल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com