Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आतापर्यंत दोन वेळा काँग्रेसच्या हायकमांडने दिल्लीत बैठका घेतल्या आहेत. त्यामध्ये नेतेमंडळींच्या भूमिका जाणून घेतल्या आहेत. एकीकडे काँग्रेसची महाविकास आघाडीसोबत एकत्रित लढणार की स्वबळावर निवडणूक लढविणार याचा निर्णय होणे बाकी असतानाच आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मुंबईच्या शहराध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्याविरोधात पक्षातील दोन आमदारांनी दिल्ली दरबारी तक्रार केली आहे.
राज्यातील सर्वच पक्षाने एकीकडे निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्यातच दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी काही थांबत नसल्याचे दिसत आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसत आहे. त्यामुळे आता हायकमांडकडून या तक्रारीनंतर काय भूमिका घेतली जाणार याकडे लक्ष लागले आहे.
आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु आहे. त्याचवेळी मुंबईत काँग्रेस (Congress) पक्षाची जनसभा पार पडली. मुंबई काँग्रेसतर्फे या सभेचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे खासदार इमरान प्रतापगडी यांनी मार्गदर्शन केले. त्याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीसाठी तयारीला लागण्यास सांगितले आहे.
यावेळी आमदार असलम शेख (Aslam Shaikh), आमदार अमीन पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळाली. मात्र मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप आणि नसीम खान हे या कार्यक्रमात अनुपस्थित पाहायला मिळाले. नसीम खान आणि भाई जगताप हे वर्षा गायकवाड यांच्या विरोधात आहेत, हे वारंवार समोर येत आहे. अशातच नसीम खान आणि भाई जगताप हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.
दिल्लामध्ये पक्षश्रेष्ठींसोबत असलेल्या बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण ही बैठक एका वेगळ्या कारणासाठी असली तरी मुंबई काँग्रेसमध्ये आपल्याला डावलले जात असल्याची तक्रार देखील ते करणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात वर्षा गायकवाड यांच्याविरोधात संघर्ष तीव्र होणार असल्याचे दिसत आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेसच्या दोन आमदारांने स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. मुंबईत काँग्रेस पक्षाचे महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा काँग्रेस आमदार अस्लम शेख, अमीन पटेल यांनी व्यक्त केली आहे. जरी आमदारांची ही इच्छा असली तरी सगळे निर्णय दिल्ली घेणार असल्याचे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.