IAS Transfer Orders : फडणवीस सरकारकडून प्रशासनात पुन्हा मोठे फेरबदल, अहिल्यानगरला नवे जिल्हाधिकारी; 'या' 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

IAS Transfer News : राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून वरिष्ठ प्रशासनामध्ये मोठे फेरबदल करण्यात येत आहेत.यात राज्यातील वरिष्ठ आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.
IAS Transfar
IAS TransfarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेत आल्यापासून प्रशासकीय अधिकाच्या बदल्यांचा धडाका सुरू असल्याचं दिसून येत आहे.गेल्याच आठवड्यात राज्य सरकारकडून 13 आयपीएस (IPS)अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.आता नव्या वर्षात आयपीएस व आयएएस (IAS) अशा एकूण 50 पेक्षा अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची ऑर्डर सरकारकडून काढण्यात आली आहे.

राज्य सरकारकडून (State Government) गुरुवारी (ता.6) आठ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले.त्यात पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी एम जे प्रदीप यांची तर राधाविनोद शर्मा यांची मीर भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

राधाविनोद शर्मा यांच्याकडे याआधी एमएमआरडीएचे महानगर सहआयुक्त यांची जबाबदारी होती. तर पुणे महापालिकेचे नवे अतिरिक्त आयुक्त एम.जे. प्रदीप चंद्रेन हे उद्योग संचालनालय विभागाच्या अतिरिक्त विकास आयुक्तपदी कार्यरत होते.

IAS Transfar
Congress vice president quits : राहुल गांधी मुंबईत असताना विदर्भात काँग्रेसला मोठा धक्का ; आता 'या' बड्या नेत्याने सोडला पक्ष!

याचवेळी राज्य सरकारने यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदेही रानडे यांची बदली करण्यात आली आहे.

राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून वरिष्ठ प्रशासनामध्ये मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. यात राज्यातील वरिष्ठ आयपीएस व आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे.सरकारच्या या बदल्यांच्या धडाक्यामुळे प्रशासनात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

IAS Transfar
Pankaja Munde meets Dhananjay Munde: महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी घडामोड, पंकजा मुंडे धनंजय मुंंडेंच्या अचानक भेटीला,राजीनाम्यानंतर पहिलीच भेट

Maharashtra IAS Transfer List

1. राधाविनोद शर्मा (IAS:RR:2012) महानगर सहआयुक्त, MMRDA, मुंबई यांची मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

2. एम.जे. प्रदीप चंद्रेन (IAS:RR:2012) अतिरिक्त विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांची पुणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

3. बाबासाहेब बेलदार (IAS:SCS:2015) अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग यांची अल्पसंख्याक विकास आयुक्त, छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

4. जगदीश मिनियार (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS Transfar
Solapur Politic's : माजी मंत्री, माजी आमदार अन्‌ जिल्हाप्रमुखांनी सोडली ठाकरेंची साथ; शिंदेंच्या सेनेचे शिवधनुष्य घेणार हाती!

5. गोपीचंद कदम (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, सोलापूर यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. वैदेही रानडे (IAS:SCS:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. डॉ. अर्जुन चिखले (IAS:SCS:2015) सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर यांची फी नियामक प्राधिकरण, मुंबई, सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. डॉ. पंकज आशिया (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, यवतमाळ यांची अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com