Congress News : फडणवीस, ठाकरे भेटीच्या चर्चेवर हर्षवर्धन सपकाळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,' शहानिशा झाल्याशिवाय...'

Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. या दोन नेत्यांची भेट वर्षा या निवासस्थानी झाला असल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसने केला असून त्याबाबत ट्विट केले आहे.
Harshawardhan Sapkal
Harshawardhan Sapkal sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या राज्यातील विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी मध्यरात्री भेट झाल्याची चर्चा सुरू आहे. या दोन नेत्यांची भेट वर्षा या निवासस्थानी झाला असल्याचा दावा ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसने केला असून त्याबाबत ट्विट केले आहे. या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया येत असताना भप व ठाकरे सेनेच्यावतीने या भेटीची चर्चा फेटाळून लावली आहे. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या राजकीय घडामोडीवर ठाकरे सेनेचा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसची काय भूमिका असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यावर आता काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीसंदर्भात म्हणाले, 'ही अफवा आहे, या संदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.'

Harshawardhan Sapkal
Parbhani ZP : परभणी झेडपीचा अध्यक्ष महायुतीचाच! भाजपाला रोखण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रयत्नांना ब्रेक

यावर प्रसार माध्यमाशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी सावध भूमिका घेतल्याचे दिसत आहे. या दोन नेत्यांमधील भेटीबाबत कुठलाच आधार नाही. या प्रकरणाची शहानिशा झाल्याशिवाय त्यावर मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना म्हणाले.

Harshawardhan Sapkal
Maharashtra Political Updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी अद्याप त्या प्रकरणात माफी मागितलेली नाही, आणि त्यांनी जी दिलिगीरी व्यक्त केली आहे, ती त्यांनी कशा संदर्भात व्यक्त केली त्याचा खुलासा देखील या ठिकाणी करणे आवश्यक आहे. त्यांनी अतिशय अश्लील भाषेत शिव्या दिल्या, त्यानंतर त्यांनी कुठंतरी जातिवाचक टिपणी केली, अशाप्रकारचे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणे गरजेचे आहे, असे यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Harshawardhan Sapkal
Maharashtra Politics Live Update : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल, महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com