धक्कादायक : महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची बनावट पदोन्नती ; गुन्हा दाखल

पाच अधिकाऱ्यांना भारतीय प्रशानसन सेवत (IAS) पदोन्नती दिल्याचे बनावट आदेश काढण्यात आले आहेत. या प्रकरणी मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Revenue Department
Revenue Department sarkarnama
Published on
Updated on

पुणे : आरोग्य विभाग, म्हाडा परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या घटना ताज्या असतानाच आता राज्यातील महसूल विभागातील (Revenue Department officer) अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढल्याचा नवीन प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. महसूल खात्यात अप्पर जिल्हाधिकारी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढण्यात आल्याचं समोर आलं आहे.

राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या पाच अधिकाऱ्यांना भारतीय प्रशानसन सेवत (IAS) पदोन्नती दिल्याचे बनावट आदेश काढण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाची राज्याच्या प्रशासन विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणाची आता चैाकशी करण्यात येत आहे. प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्यासाठी महसूल विभागाने मुंबई पोलिसांना एक पत्रही लिहिलं आहे.

राज्य सरकारचे अवर सचिव अ.ज. शेट्ये यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात (Marine Drive Police Station Mumbai) याप्रकरणी फिर्याद दिली आहे. बनावट आदेशाचे पत्र तयार करुन ते समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. गेल्या सहा जानेवारीरोजी ही पत्रे व्हायरल झाली आहेत. महसूल मंत्री यांचे सचिव रामदास खेडकर यांच्यासह उमेश महाजन संकेत चव्हाण मनीषा वाजे धनंजय निकम या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश काढण्यात आले आहेत.

या पत्रात म्हटलं आहे की, अपर जिल्हाधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत समायोजित करुन पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना देणेबाबतचा दिनांक 6 जानेवारी 2022 रोजीचा आदेश निर्गमित झाल्याची बाब महसूल मंत्री यांच्या कार्यालयाकडून या विभगाच्या निदर्शनास आणण्यात आली आहे. हा आदेश हा पूर्णपणे बनावट आहे. आदेश खोट्या स्वाक्षरीने काढण्यात आलेला आहे. हा आदेश व अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही महसूल व वन विभागामार्फत करण्यात आलेली नाही. अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही महसूल व वन विभागामार्फत करण्यात आलेली नाही.

Revenue Department
शिरूरचे माजी खासदार आढळरावही झाले कोरोना पॉझीटीव्ह

भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने नियुक्ती देणे, हा विषय महसूल व वन विभागाशी संबंधित नसून सामान्य प्रशासन विभागाशी संबंधित आहे. या सर्व बाबी पाहता, सदर प्रकरणाची चौकशी करुन फैाजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे पोलिसांना पाठविलेल्या पत्रात महसूल विभागाने म्हटलं आहे.

असे आहेत अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे बनावट आदेश?

उन्मेश महाजन

कार्यरत पदनाम - अप्पर जिल्हाधिकारी गडचिरोली

समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - जिल्हाधिकारी गोंदिया

रामदास खेडकर

कार्यरत पदनाम - खासजी सचिव महसूल

समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - प्रधान खासजी सचिव महसूल

संकेत चव्हाण -

कार्यरत पदनाम - अतिरिक्त मनपा आयुक्त ठाणे

समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - अतिरिक्त मनपा आयुक्त अ श्रेणी ठाणे मनपा

धनंजय निकम

कार्यरत पदनाम - अपर जिल्हाधिकारी भंडारा

समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - जिल्हाधिकारी भंडारा

मनिषा वाजे

कार्यरत पदनाम - अपर जिल्हाधिकारी अमरावती

समायोजित झाल्यानंतर पदस्थापना - अतिरिक्त मनपा आयुक्त अ श्रेणी अमरावती मनपा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com