Raju Shetti News : शेतकरी नेते राजू शेट्टींची मोठी घोषणा; म्हणाले, ''सर्वच पक्ष नालायक म्हणून...''

Maharashtra Politics : रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही....
Raju Shetti
Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Latur News : सगळेच राजकीय पक्ष नालायक असून त्यांच्यावर शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वास नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजू शेट्टी हे लातूर जिल्ह्यातल्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यासाठी आले होते.यावेळी त्यांनी अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाई, विमा कंपन्या अशा विविध मुद्द्यांवरिुन सरकारला धारेवर धरले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

Raju Shetti
Ravindra Chavan Attack On Rohit Pawar: भाजपच्या मंत्र्याने काढली रोहित पवारांची औकात; टि्वटवरुन वाद चिघळला..

राजू शेट्टी म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय. विमा कंपन्यावर नियंत्रण करणाऱ्या आयआरओ संस्थेकडे तक्रारी देखील केल्या. पण काही होत नाही. विमा कंपन्या कसे घोटाळे करतात त्याचे पुरावेही दिले. त्याचीही दखल घेतली नाही. केंद्र आणि राज्याच्या तिजोरीवर पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दरोडा टाकला जात आहे असल्याचा हल्लाबोलही राजू शेट्टी( Raju Shetti) यांनी यावेळी केला.

...म्हणून भाजप आणि आघाडीतून बाहेर पडलो!

रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष सुरु आहे. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही असं ठणकावून सांगणं गरजेचं आहे. आम्ही भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो. तसेच महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत असल्याचा उच्चारही शेट्टी यांनी केला.

Raju Shetti
Uddhav Thackeray Speech : 'वज्रमूठ सभेला प्रतिसाद नव्हता, बाहेरून माणसं आणली'; उद्धव ठाकरेंना कोणी डिवचलं?

..तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही!

मी मांडलेला हमीभावाचा कायदा अजून तो प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणं गरजेचं आहे असल्याचंही

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com