Uddhav Thackeray Speech : 'वज्रमूठ सभेला प्रतिसाद नव्हता, बाहेरून माणसं आणली'; उद्धव ठाकरेंना कोणी डिवचलं?

Vajramuth Sabha : लोकांना पाणी पाहिजे, पण तुम्ही शहराला नवीन नाव देऊन गेलात?
Uddhav Thackeray Speech :
Uddhav Thackeray Speech : Sarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Speech : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi NewS) संयुक्त सभा होत आहे. या सभेला वज्रमूठ (Vajramuth Sabha) सभा असे नाव देण्यात आले आहे. या सभेला माजी मुख्यमंत्री व शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रांतअध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्रीअशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे दिग्गज नेते उपस्थित राहिले आहेत. यावर आता खासदार जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Uddhav Thackeray Speech :
Sarpanch Shirgaon Murdered : धक्कादायक ! प्रतिशिर्डी शिरगावच्या सरपंचाचे सपासप वार करून निर्घृण खून; परिसरातून हळहळ व्यक्त..

"वज्रमूठ सभेला प्रतिसाद दिसत नव्हता, सभेला बाहेरून लोकं आणली होती, असे संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. "महानगर पालिकेत त्यांची इतकी वर्षे सत्ता होती आपण पाणी लोकांना देवू शकलो नाही, शहराला तुम्ही नवीन नावे देवून गेलेले आहात. तुम्ही वारंवार जे मुद्दे काढता, लोकं त्रस्त झालेले आहेत. लोकांना रोजगार पाहिजे, पाणी पाहिजे. चांगले रस्ते पाहिजे," असे जलील म्हणाले.

Uddhav Thackeray Speech :
Uddhav Thackeray News :...अन्यथा त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं; ठाकरेंनी सत्तार अन् शिसरसाटांना सुनावलं

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आजच्या सभेतूव भाजप - शिंदे गटावर टीका केली. उद्धव ठाकरे म्हणाले, ''एक गद्दार सुप्रिया सुळे यांना शिवी देतो, मग तुमचं हेच का हिंदुत्व? एक गद्दार सुषमा अंधारे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर टीका करतो. अशा लोकांच्या तोंडून हिंदुत्व बोलायची लायकी नाही. जर हे शिवसेनेत असते तर त्यांची तसं बोलायची हिंमत झाली नसती."

"अन्यथा त्यांना लाथ मारून गेटआऊट म्हटलं असतं. मतं पटत नसतील, तर मतांवर बोला. पण महिलांविषयी बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. अशा लोकांनी गौरव यात्रा काढली. हे शोभत नाही'', असं म्हणत ठाकरेंनी अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांना सुनावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com