Ravindra Chavan attack on Rohit Pawar : देशात गेल्या काही दिवसांपासून महाराज, बाबा लोकांच्या वक्तव्यावरुन वाद सुरू आहेत. यात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री आणि आता कालीचरण महाराज आघाडीवर आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्ट लिहून भाजपवर निशाणा साधला होता. यावर आता भाजप आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलं आहे. ते डोबिवली येथे बोलत होते.
"कोण रोहित पवार? त्यांच्याबद्दल काय बोलावे ? बोलण्याची औकात नसलेला तो माणूस आहे. ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर कळत नाही, त्याला बोलण्याचा काहीच अधिकार नाही," अशा शब्दांत रविंद्र चव्हाण रोहित पवार यांच्यावर केली आहे.
यावेळी मंत्री चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पवार यांच्यावर टिका केली आहे. पवार यांनी आपल्या ट्विट मध्ये भोंदू बाबांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गांधी नष्ट करण्याचे कुणी कितीही प्रयत्न केले तरी ते नष्ट होऊ शकत नाहीत, जगात गांधी विचार अजरामर आहे. पण हे विचार संपवण्याचा एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिम्मत असेल तर भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस त्यांनी दाखवावं! असे म्हटले होते यावर चव्हाण यांनी कोण रोहित पवार ? असे म्हणत टिका केली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान हिंदुस्तान सहन करणार नाही, अशा घोषणा देत डोंबिवली शहरातून रविवारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेनेचे युवा पदाधिकारी दीपेश म्हात्रे, राजेश मोरे, महेश पाटील, संदीप माळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सावरकर गौरव यात्रेविषयी बोलताना चव्हाण म्हणाले, "राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीने वारंवार स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करत आहेत. युपीए मध्ये असणारे सर्व घटक पक्ष त्यांचे प्रमुख हे सुद्धा गांधी यांना पाठिंबा देत आहेत. खरे तर सावरकर यांचे या देशासाठीचे योगदान लक्षात घेता हा खऱ्या अर्थाने भारतीय नागरिकांचा तसेच सर्व स्वातंत्र्य सैनिकांचा हा अपमान आहे. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये सर्व ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे देशप्रेमी मंडळी आज या गोष्टीचा निषेध करत आहेत.
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर बाबा यांनी आता शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. "संताची पूजा करायची तर हिंदूंमध्ये संत कमी आहेत का? तुलसीदास, सूरदास किंवा इतर कोणतेही संत असोत ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते ईश्वर नाहीत. त्याचप्रमाणे साईबाबा हे संत असू शकतात, फकिर असू शकतात. मात्र, ईश्वर नाही," असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.