Farmer loan : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: 'या' तारखेपर्यंत खात्यात येणार कर्जमाफीचा निधी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

Dattatray Bharane farmer loan waiver money deposit date Maharashtra : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे.
Dattatray bharane
Dattatray bharaneSarkarnama
Published on
Updated on

राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निधीबाबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची घोषणा केली असून, येत्या 2 ते 4 दिवसांत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या पैशांची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत सुमारे 5 ते 10 हजार कोटी रुपयांचा कर्जमाफी निधी वितरित केला जाणार आहे. सध्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्यांची पडताळणी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. शासनाकडून ही प्रक्रिया पूर्ण होताच निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.

Dattatray bharane
Hinganghat Accident: स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या तीन चिमुकल्या मुलींचा शाळेजवळच अपघाती मृत्यू

या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील पात्र शेतकऱ्यांना एकूण 40,585 कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. सुरुवातीला कर्जमाफीसाठी 36,000 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. मात्र, महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध झाल्याने कर्जमाफीची एकूण रक्कम आता 40,585 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी पहिल्या टप्प्यात 5,000 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले. आता पुढील 2 ते 4 दिवसांत आणखी 5 ते 10 हजार कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची तयारी सुरू आहे. याबाबत कोणतीही अडचण नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Dattatray bharane
Manoj Jarange Patil : मोठी बातमी! मराठा आंदोलकांची चिंता वाढली! मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, तापाने फणफणले!

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, "ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण किंवा इतर प्रशासकीय कामे अद्याप अपूर्ण आहेत, त्यांनी ते काम ताबडतोब पूर्ण करून घ्यावे." ज्या पात्र शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या पोर्टलवर आहेत, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, आवश्यक कागदपत्रे आणि इतर प्रलंबित प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com