

7/12 Name Update: राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाहीत, अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील तब्बल 2 लाख 31 हजार शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सातबाऱ्यावरील नोदीनंतर या शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग मोकळा होईल.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना 15 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शेती करत आहेत मात्र शेती नावावर नाही, शेतकऱ्यांकडे देवस्थान, कबुलायतदार, इनाम किंवा वतन जमिनी आहेत. मात्र, त्यावरील सातबाऱ्यांवर त्यांची नोंद नाही. त्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्व कागदपत्रे गोळा करून सहकार विभागाकडे पाठवण्यात येणार आहेत.
या निर्णयामुळे भविष्यात या शेतकऱ्यांना अॅग्रीस्टॅक काढण्यासाठी मदत होईल. ज्यांचा अॅग्रीस्टॅक निघत नाही त्याची इतर कागदपत्रे घेऊन त्यातून मार्ग काढण्यात येईल, महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी घेण्यात आल्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागात सह दुय्यम निबंधक वर्ग-२ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० पदे निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच विभागाच्या अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण करून त्यांची संख्या १५ वरून १० करण्यात येणार आहे, असे देखील बावनकुळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.