New Rule : तुमचे बजेट बिघडणार? 1 डिसेंबरपासून पेन्शन ते एलपीजीपर्यंत बदलणार 'हे' 5 महत्त्वाचे नियम, एका क्लिकवर!

Five Important Rule Changes from December 1 : 1 डिसेंबरपासून लागू होणारे LPG, पेन्शन, कर आणि इतर आर्थिक नियम तुमच्या बजेटवर थेट परिणाम करणार आहेत. सर्व माहिती एका क्लिकवर मिळवा.
New Rule
New RuleSarkarnama
Published on
Updated on

सर्वसामान्यांसाठी डिसेंबरपासून काही महत्त्वाचे आर्थिक बदल लागू होणार आहेत. नवीन दर, नियम आणि अंतिम मुदती थेट तुमच्या दैनंदिन खर्चावर परिणाम करू शकतात. एलपीजी, सीएनजी-पीएनजी दरांपासून पेन्शन आणि करसंदर्भातील प्रक्रियेपर्यंत पाच मोठे बदल 1 डिसेंबरपासून लागू होतील.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी सरकारच्या मालकीच्या एलपीजी कंपन्या गॅस सिलेंडरच्या दरांमध्ये बदल जाहीर करतात. नोव्हेंबरमध्ये व्यावसायिक वापराच्या 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या दरात 6.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र, घरगुती गॅसच्या दरांमध्ये बदल करण्यात आले नव्हते. आता 1 डिसेंबरला पुन्हा एकदा घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरचे नवे दर जाहीर केले जातील. त्यामुळे गॅस बजेटमध्ये वाढ किंवा कपात होण्याची शक्यता आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. यूनिफाईड पेन्शन योजना निवडण्यासाठी सरकारनं 30 नोव्हेंबरची अंतिम मुदत निश्चित केली आहे. यापूर्वी ही अंतिम तारीख 30 सप्टेंबर होती. आता कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला एनपीएस किंवा यूपीएस या दोन्हीपैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. 30 नोव्हेंबरनंतर हा पर्याय निवडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी असल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी निर्णय लवकर घेणे आवश्यक आहे.

New Rule
DK Shivakumar News : कर्नाटकात 'एकनाथ शिंदे' चर्चेत असतानाच शिवकुमार मुंबईत; सिध्दरामय्यांसोबत थेट पंगा?

पेन्शनधारक ज्येष्ठ नागरिकांसाठीही एक महत्त्वाची अट आहे. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी त्यांनी 30 नोव्हेंबरपूर्वी लाईफ सर्टिफिकेट जमा करणे बंधनकारक आहे. जर हे प्रमाणपत्र वेळेत जमा झाले नाही, तर पेन्शन थांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी हे प्रमाणपत्र वेळेवर सादर करणे महत्त्वाचे आहे.

करदात्यांसाठीही 30 नोव्हेंबर ही महत्त्वाची तारीख आहे. ऑक्टोबरमध्ये टीडीएस कपात झाल्याच्या परिस्थितीत सेक्शन 194-IA, 194-IB, 194M आणि 194S अंतर्गत आवश्यक स्टेटमेंट जमा करणे आवश्यक आहे. तसेच, सेक्शन 92E अंतर्गत रिपोर्ट जमा करण्याचीही हीच शेवटची तारीख ठरवण्यात आली आहे. या प्रक्रियेत उशीर झाल्यास पुढील आर्थिक व्यवहारांमध्ये अडचणी येऊ शकतात.

New Rule
Mahayuti Politics : 'आता घड्याळाची वेळ चांगली नाही, इकडे तिकडे बघू नका...'; शिवेंद्रराजेंनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला डिवचलं

दर महिन्याप्रमाणेच 1 डिसेंबरला तेल कंपन्या सीएनजी, पीएनजी आणि जेट फ्यूलचे नवे दर जाहीर करतील. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेनुसार एटीएफ (जेट फ्यूल) चे दर बदलतात. त्यामुळे प्रवास आणि दैनंदिन इंधन खर्चावरही याचा परिणाम दिसू शकतो. या सर्व बदलांमुळे डिसेंबर महिना आर्थिक दृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे. नागरिकांनी वेळेत आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करून या बदलांशी जुळवून घ्यावे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com