BJP Political News : 50 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच...; 'सहकार' क्षेत्रातही भाजपचा बोलबाला!

Harshvardhan Patil : काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राज्य केले. त्याला या पक्षांचा सहकारातील भक्कम असलेला पाया हे कारण होय.
BJP Political News
BJP Political NewsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : देशाच्या राजकारणात दीर्घ काळ वर्चस्व मिळवायचे असेल तर सहकार विभागवार सुद्धा आपले वर्चस्व असायला पाहिजे, याची जाणीव भाजपला झाली आणि त्यांनी काही वर्षांपासून यात लक्ष घालायला सुरुवात केली होती. त्याचा परिणाम म्हणा पन्नास वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच साखर संघावर भाजपने वर्चस्व मिळवले असून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी गुजरातचे केतन भाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.

महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सहकाराचे मोठे जाळे आहे. साखर, दूध, सुत गिरण्या, सहकारी बँक, विविध सोसायट्या अशा एक ना अनेक माध्यमातून आर्थिक आणि मनुष्यबळ हाती येते आणि विशेष म्हणजे राज्याच्या राजकारणात आपले वर्चस्व तयार करता येते. काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राज्य केले. त्याला या पक्षांचा सहकारातील भक्कम असलेला पाया हे कारण होय. भाजपने ही गोष्ट आता ओळखली असून सहकारकडे आपला मोर्चा वळवला आहे.

BJP Political News
Vinod Tawde : मराठी माणूस ठरला देश पातळीवर 'पावरफुल' नेता!

या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याबद्दल पाटील यांनी अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ते आज पाटील यांच्या निवडीच्या माध्यमातून भाजपला ५० वर्षाच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघावर आपला झेंडा फडकावता आला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र जास्त आहे. येथे साखर कारखानदारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. येथील राजकीय क्षेत्रावर सहकाराच्या राजकारणाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण संस्थेच्या कारभाराची सूत्रे पाटील यांच्या हाती जाण्याला एक वेगळे महत्त्व आहे.

महासंघाचे कार्यालय नवी दिल्ली येथे असून देशातील साखर उद्योगाला मार्गदर्शन करणे, तसेच साखर उद्योगांपुढील अडचणी केंद्र सरकारकडे मांडणे, केंद्राकडे पाठपुरावा करून साखर कारखानदारीच्या प्रश्नांची तड लावणे आदी कामे महासंघाच्या माध्यमातून केली जातात.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसमध्ये असताना हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी राज्याचे सहकार मंत्रीपद भूषवले होते. त्या अनुभवाचा विचार करून त्यांची निवड केल्याचे बोलले जात आहे. सहकार क्षेत्रात सर्वपक्षीय नेते सक्रिय असून राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, राज्य सहकारी साखर संघ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांसारख्या संस्थांवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या संस्थांची वाटचाल सुरू आहे. परंतु या संस्थांवर राष्ट्रवादीचे दोन्ही गट, कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते विविध पदे भूषवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही दिलीप वळसे पाटील, अजित पवार या संस्थांच्या कामकाजात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत बसत असल्याचे चित्र दिसते. तसेच हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आदी नेत्यांनी आपले पक्ष बदलून भाजपचा आश्रय घेतल्यानंतरही त्यांचे या संस्थांतील स्थान कायम राहिले आहे. तसेच भाजपच्या नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यासुध्दा या संस्थांमध्ये सक्रिय आहेत.

BJP Political News
Raj Thackeray : आजोबा म्हणूनही राज ठाकरेंनी ट्रेंड सेट केलाय; जॅकी श्रॉफ यांच्या 'त्या' वक्तव्याचा मनसेकडून...

दुसऱ्या बाजूला या नेमणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील यांचे भाजपने (BJP) पुनर्वसन केले असल्याचे बोलले जात आहे. लोकसभेला बारामती मतदारसंघातून पाटील यांना तिकीट मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. त्याला पूर्णविराम मिळाल्यानंतर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या वतीने त्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा सुरू झाली. परंतु तिथेही निराशा पदरी पडल्यानंतर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माध्यमातून पाटील यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे, असे मानले जात आहे.

पाटील काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यानंतर त्यांना भाजपमध्ये विशेष महत्त्वाचे असे कोणतेही पद देण्यात आले नव्हते. साखर कारखानदारीच्या संदर्भात केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी जाणाऱ्या भाजपच्या शिष्टमंडळांत त्यांचा समावेश केला जात असे. आता हर्षवर्धन यांना ताकद देऊन भाजपने भविष्यातील आपल्या वर्चस्वाची चुणूक दाखवली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

BJP Political News
Rajya Sabha Election: 7 मंत्र्यांचा पत्ता कट करून PM मोदींनी वर्षापूर्वी दिलेला इशारा खरा करून दाखवला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com